Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिजाऊ बँक महिलांसाठी सदैव तत्पर

Responsive Ad Here

 जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी                 

   श्री अविनाश कोठाळे जिजाऊ ही सर्व महिलांचे प्रेरणास्त्रोत आहे. आदर्श आहे तिने ज्या विपरीत परिस्थितीमध्ये दोन दोन राजांना घडवलं तेवढी विपरीत परिस्थिती निश्चितच आज नाही महिलांनी समोर येऊन निर्भयपणे पूर्ण आत्मविश्वासाने आपले छोटेखानी उद्योग उभारून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी जिजाऊ  कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक सदैव तत्पर राहील असे उद्गार बँकेचे अध्यक्ष श्री अविनाश कोठाळे यांनी काढले. 

     भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या सचिव तथा पी डी एम सी प्रभागाच्या नगरसेविका सौ सुरेखाताई लुंगारे यांच्या नेतृत्वामध्ये जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभागृहामध्ये  बचत गटाच्या  महिलांच्या मिटींगचे आयोजन केले होते त्या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. याप्रसंगी सौ सुरेखा ताई लुंगारे यांनी आज समाजामध्ये अनेक स्त्रिया प्रशिक्षण घेऊन आपला उद्योग सुरू करण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळे तसेच मार्केटिंगचे सखोल ज्ञान  नसल्यामुळे त्या आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही. अशा वेळी बँकेकडून आपल्याला सर्वतोपरी मदत मिळेल असे सुरेखाताई लुंगारे यांनी म्हटले.  याप्रसंगी अनेक उद्योजक महिलांनी आपल्या उद्योगा संदर्भात  माहिती दिली तसेच अडचणी सुद्धा सांगितल्या. तेव्हा श्री शिवाजी आवटे व श्री ठाकरे यांनी महिलांच्या उद्योगा संदर्भातल्य समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यात येतील असे 

  सांगितले. यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री अविनाश कोठाळे यांनी लुंगारे दाम्पत्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.याप्रसंगी रत्नमाला रामटेके, आरती काळे ,निकिता पवार, दिव्या डुकरे, मनीषा ढवळे ,नम्रता होले, ज्योती घाडगे ,स्मिता कावळे, वैशाली आरो कर, परविन चव्हाण, मनीषा नंदेश्व,र दिपाली गिरमकर, मंगला ढोले, रेश्मा बोर्डे, सहे ना परविन, नीलिमा अंजिकर, वैष्णवी अंजीकर, अर्चना चव्हाण, रेणुका पवार, अंजू ता चव्हाण, परवीन चव्हाण,मितुस भोसले, सुष्मिता चव्हाण सह अनेक बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.