Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मधील अनियमिततेचि चौकशी

Responsive Ad Here

 अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे                                                                                                                                      अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मधील   अनियमिततेचि चौकशी संचालक मंडळाकडूनच लावण्यात आली. चौकशीला आमचे पूर्णतः सहकार्य आहे. असे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे म्हणणे आहे असे असताना विरोधकांकडून सत्तेचा वापर करून त्रास देणे व बदनामी करणे असे गढूळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. चौकशीअंती आम्हा संचालक मंडळावर कोणताही आक्षेप असणारच नाही ह्याचा विश्वास आहे आम्हाला आहे. परंतु जिल्हा बँकेच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनल चे पारडे जड असल्याने व पराभव दिसत असल्याने विरोधकांकडून याबाबत संभ्रम, संशय निर्माण करण्यात येत आहे.  




          विदर्भातील इतर जिल्ह्यातील सहकारी बँकांची स्थिती, दिवाळखोरी आणि मागील 20 वर्षेपासून आमच्या पॅनल च्या नेतृत्वात अमरावती जिल्हा बँकेची प्रगती व मोठ्या प्रमाणात झालेला नफा या बाबी जिल्यातील जनता, शेतकरी, सहकार क्षेत्रातील मंडळी जाणून आहेत. बँकेत घोटाळा असता तर बँक बुडाली असती हे आपणासही कळते. बँकेत आमचे पॅनल ची सत्ता येण्या अगोदर रिझर्व्ह बँकेने बँकेचे licence रद्द केलेले होते व त्यावेळी बँकेची ठेव 300 कोटी ची होती. आमच्या सत्ताकाळात बँकेचे licence कायम करून ठेवी वाढविल्या, आज 2300 कोटीच्या ठेवी आहेत. शेतकरी हिताची बँक आहे , आम्ही शेतकरी हितासाठीच बँक चालविली व चालवू

           त्यामुळे विरोधकांच्या अशा कोणत्याही षड्यंत्राला आपण बळी पडू नये असे आवाहन माजी आमदार प्रोफेसर वीरेंद्र जगताप यांनी केली आहे  चौकशी अंती करून दूध का दूध और पाणी का पाणी होणारच आहे. माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप