प्रतिनिधी देऊळगाव राजा भिमराव चाटे
देऊळगाव राजा जाफराबाद बायपास देऊळगाव राजा ते चिखली बायपास वर असलेले शहरांचे नाव दर्शक बोर्ड नाव फलक जे खुप चांगल्या प्रकारे आणि उंचावर लावलेले होते ते अज्ञात चोरट्यांनी काढून नेले आहेत येथील उंचावर असलेला मोठा लाईट सुद्धा बंद आहे येथे दररोज ॲक्सिडेंट घडत असतात ह्या घटना स्थळांची वारंवार बातमी सुद्धा आलेली आहे सरकार आपले काम करते परंतु काही निकृष्ट दर्जाचे भंगार चोर डोक्याने भंगार असलेले व्यक्ती काम करतात .
म्हणून या कॉर्नर वर उंचावर सीसीटीव्ही कॅमेरे असावेत दुर्घटना आणि चोऱ्या का घडतात याचे जिवंत उदाहरण पाहून त्यावर उपाय योजना करता येईल दुष्ट प्रवृत्तीचे चोर या घटनांना रात्रीचं पूर्ण करतात गाड्या स्पीड मध्ये असतात इथे स्पीड ब्रेकर नाही बायपास चा मोड उतार रस्त्यावर आलेला आहे पाच-दहा मिनिटे बारकाईने या रस्त्यावर उभे राहून विचार केल्यावर या त्रुटींची ताबडतोब लक्षात येते शासन आणि प्रशासनाने डिव्हायडर बनवणे नाम फलक लावणे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे उंचावर लाईट लावले पण त्याला कनेक्शन दिले नाही .
असे येथील रहिवासी सांगतात त्याला कनेक्शन देणे आणि विशेष म्हणजे शासन प्रशासनाकडून याच लाईटच्या पोलवर चाळीस फूट उंचीवर चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर बऱ्याच अपराधी घटनांचा तिसरा डोळा आपल्याला चित्र दाखवेल शासन आणि प्रशासन सुविधा देण्यास असमर्थ ठरत असेल तर त्यांनी काही स्वयंसेवकांना जे इच्छुक आहे त्यांना आवाहन करावे चांगल्या कामासाठी बरेच स्वयंसेवक आव्हान झाल्यावर पुढे येतील
