Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

साईनगर भागातील पुलाचे निकृष्ट बांधकाम

Responsive Ad Here

 जयकुमार बुटे /अमरावती प्रतिनिधि


अमरावती साईनगर या भागातील अकोली या रोडवरील पावसाळ्यामध्ये पुलाच्या वरून पाणी जात असते तसेच या पुलाचे उद्घाटन एक ते दीड वर्ष झाले माननीय नगरसेवक तुषार भारतीय यांनी उद्घाटन करून जनतेला आश्वासन दिले होते की पुलाला पाईप टाकून सपोर्ट देण्यात येईल पण आज पर्यंत काम पूर्ण करण्यात आले नाही.

       तसेच साईनगर मधले विकास पुरुष म्हणून नगरसेवक तसेच गट नेता तुषार भारतीय यांना ओळखले जाते तरीसुद्धा या पुलाचे काम आजपर्यंत करण्यात आलेले नाही अकोली भागातील लोकांना अतोनात त्रास पावसाळ्यात सहन करावा लागत आहे तसेच अमरावती चे महापौर चेतन गावंडे हे सुद्धा याच भागातले नगरसेवक असून तरी सुद्धा लक्ष देण्यात आले नाही अकोली भागात पत्रकार जय कुमार बुटे हे जात असताना साईनगर चे माजी शिवसेना विभाग प्रमुख वसंत सु गौरखेडे यांनी माझ्या समोर भावना व्यक्त केली आणि नगरसेवक का बद्दल नाराजी दिसून आली .


      तसेच लोकांनी नगरसेवकाना हात जोडून नम्र विनंती केली आहे की या पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे तसेच पुलाच्या साईडला  सेफ्टी पाईप नसल्याने अपघात कधी पण होऊ  शकते  असे आकोली भागाच्या नागरिकांचे म्हणणे आहे  विकास पुरुष म्हणून ओळखणारे नगरसेवक तुषार भारतीय यांच्या विकासातून आतापर्यंत काम होऊ शकले नाही त्याबद्दल आकोली भागातील जनतेने नाराजी व्यक्त केली तसेच , या वेळी प्रामुख्याने श्री वसंत गौरखेडे,श्री अनिलभाऊ नंदनवार, श्री गजानन भाऊ डोंगरे , श्री योगेश वानखडे सह अनेक  नागरिक उपस्थित होते.