Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सैनिकी डायरी

Responsive Ad Here

प्रतिनिधी देऊळगाव राजा भीमराव चाटे 

        सैनिक डायरी    सोशल मीडियावर न्यूज  पेपर वर,माजी सैनिक संघटनेच्या बाबत त्रिदल सैनिक संघटनेच्या बाबत बातमी व्हायरल होत आहे. काय खरे काय खोटे ते ते तपासण्यासाठी त्याच्यामुळापर्यंत जाण्याची गरज आहे

फिर्याद जर एका निवृत्त फौजी अधिकाऱ्याने दिली ,तर त्यामध्ये काही तथ्य आहे का नाही? त्याचे चरित्र कसे आहे हे तपासण्यासाठी न्यायव्यवस्था असते. हे खरे पण ईश्वर अल्ला के पास देर है अंधेर नही जर अन्याय झालाच  तर,त्याला न्यायालयात दाद मागावी लागणार का?  पोलिस स्टेशनला जाऊन ताकद दाखविणे,म्हणजे न्याय मागणे कायदेशीर होईल का ?

जो सेवानिवृत्त फौजी अधिकारी सेवामुक्त फौजी वरच केस दाखल करतो तो माजी सैनिक संघटने चा सैनिक फेडरेशनचा या त्रिदल सैनिक संघटनेचा हेही मुळापर्यंत तपासले जाणे  जरुरीचे आहे .

का सैनिका सैनिका तमध्ये भिडवण्याच षड्यंत्र चालू आहे हे जाणणे जरुरी आहे .आपल्या देशात राज्यात आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक सैनिक संघटना आहेत त्यांची नावेही अलग-अलग आहेत त्यांचे कामही अलग-अलग आहेत दिसताना त्या एकमेकाच्या विरोधक दिसतात परंतु जाणकार व्यक्तीने सखोल विचार करा ,

संसाराचा नियम आहे एकमेकाचे विरोधाभासी दिसणारे तत्व एकमेकास पूरक असतात.

      सैन्यात भरती होणे ही काही साधी गोष्ट नाही कठीण परिश्रम करून ट्रेनिंग करणे ही पुन्हा मोठी गोष्ट आहे अर्धे ट्रेनिंग सोडून सहा महिन्यात पळाले ले ते चित्रे ही आपल्यासमोर आहेत. ट्रेनिंग करून कसम परेड झाली शपथविधी झाली आपल्या धर्मग्रंथानुसार आपल्याच धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतली की आग वादळ वारा अस्मानी संकटा च्या पुढे जाऊन जीवाची पर्वा न करता सर्वप्रथम देशाची रक्षा करेल आणि म्हणूनच हा देश सैनिकाच्या भरवशावर झोपतोय. शहीद होईल पण जागा सोडणार नाही शपथविधी झाला त्या च दिवशी तो फौजी झाला त्याच्या परिवाराला सर्व सैनिकास सुविधा मिळतील म्हणजे मिळतीलच, मग तो सैनिक असेल किंवा नसेल ही अमर असेल हे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेले आपल्यावर एक उपकारच केले  आहे हे आपण विसरायला नको अनवधानाने मध्येच काही नोकरी सोडून आले अनपरत गेलेच नाहीत तेसुद्धा माजी सैनिक आहेत त्यांनासुद्धा सैनिक बोर्डातून उदरनिर्वाह एकरकमी वार्षिक रक्कम मिळते कागदपत्रांची पूर्तता करणे जरुरी असते एक आमदार-खासदार लोकप्रतिनिधींचे शपथविधी झाल्यानंतर सरकार जरी पडले तरी त्यांना पेन्शन सुरू होते मग छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलणाऱ्या सैनिकांची दशा होणार नाही हे सत्य आहे आणि आपल्याला प्रत्येकाला गर्व असायला पाहिजे आपल्या हिंदुस्तानात जन्मून सैनिक होऊन  देश सीमा रक्षण करण्याचा इथे सिव्हील लाईन मध्ये तालुका बदली जिल्हा बदली झाले तर खूप मोठी आफत येते , तणाव निर्माण होतो आणि सैनिकाला जगात कुठेही जावं लागतं आदेशाचं पालन करावंच लागतं 24 ×7 चोवीस घंटे सातो दिन जागृत राहावं लागतं तपदा रेगिस्तान बर्फीला हिंदुस्तान जिथे श्वास घ्यायलाही त्रास होतो असे अनेक चढ-उतार सहन करावे लागतात. आयुष्याचा  गाभा जवानी देशासाठी कुर्बान करावी लागते मूलबाळ मोठी होतात मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुलींच्या लग्नाचा खर्च समोर आ वासून उभा असतो आणि सैनिक निवृत्त होतो आर्मीच्या  बाहेर येऊन पडतो. सैनिकाचे घर बांधायचं असतं म्हणजे सुविधा घेण्याऐवजी समस्या आणि संकटे पुढे येतात सैनिक सेवानिवृत्त होतो पेन्शन अर्ध्यावर येते आणि मेंटनस वाढते अशा काळी त्यांना पूर्ण सुविधा मिळावा यासाठी अनेक संघटना आपल्या परीने कार्य करत राहतात पण यामध्ये हेवेदावे आले राजकीय स्टंट आले कुणी स्वयं घोषित अध्यक्ष झाले कुणी लोकांच्या हृदयातून झाले आणि सर्वात मोठी गोष्ट कोरोना काळामध्ये ज्या गोष्टी सर्वांच्या समक्ष सर्व सैनिकांचे एकत्रीकरण व्हायचं होतं आर्मी नेव्ही एअरफोर्स त्रिदल सैनिक व प्यारा मिल्ट्री सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटना आणि देशातील सर्वात मोठी इंडियन एक्स सर्विसमेन लीग जी सर्वात जुनी आहे ने काम करणाऱ्या लोकांना समर्थन द्यायला पाहिजे निवडल पाहिजे म्हणजे कोण जमिनी स्तरावर जाऊन काम करतोय कोण व्हॉट्सऍप वर काम करतोय कोण प्रत्येक संघटना सोबत जाऊन ही संघटना माझीच आहे असे म्हणतोय ज्याला त्याला प्रत्येकाला आपले विचार मत मांडा व  जाणकारांनी त्यांच्यावर शिक्कामोर्तब करा.

 म्हणजे पुन्हा निवडणूक सैनिक मतदाता सैनिक मतदार सैनिक जाहिराती आपली आपली पब्लिसिटी आपल्याला मोठे दाखवण्यासाठी दुसऱ्यावर बोट दाखवण्याचे काम करू नका कोणी सैनिक हृदय सम्राट असेल तर ते त्यांनी स्वतः नाही दुसऱ्यांनी त्यांना उपमा दिल्या आहेत कारण ते सैनिकांच्या हृदयात राहण्या सारखे काम करत असतील जर त्यांना कोणी माननीय भाऊ मेजर असे संबोधत असेल तर ही सुद्धा त्यांची उपमा आहे कारण जो सेवानिवृत्त झाला त्यांची रँक चे अधिकार त्याच दिवशी संपले प्रत्येक माणसाला खायला एक सारखं लागत समान एम एस पी आणि एक सारखे जगावे लागेल .सैन्यातील पदाचा गैर अहंकार काढून टाकावा मी सुभेदार तो हवालदार सर्वांनी नोकरी सारखीच केलेली आहे आर्मीतील ड्युटी वरील पदांचे अशोक स्तंभाचे ड्रेसचे विडंबन एका मालिकेच्या सीरिजमध्ये दाखविले होते सर्व देश पेटून उठला आणि तेव्हा निर्मात्याला माफी मागावी लागली होती व पुढे सीन कट करून मालिका प्रसारित करण्यात आली सैन्यातील कोणतेही लोकांना ते पटत नाही म्हणून त्यांनी आक्षेप नोंदवला व ते सीनही कट करण्यात आले व बऱ्याच मालिका व चित्रपटांमध्ये पोलीस बांधव व राजने त्यावर लांछन लावल्याचे चित्रे मसाला लावून प्रदर्शित केले जातात सेन्सर बोर्डाने ते पासही केलेले आहेत क्या गोष्टी ची कोणत्याही संघटनेने एकता दाखवून निषेध केला नाही देशात वारीक दादा पासून ते मंत्री पदा पर्यंत च्या संघटना आहेत मी अगोदरच सांगितले की एकमेकांच्या विरोधाभासी दिसणारे तत्त्व एकमेकास पूरक असतात हा संसाराचा नियम आहे. सर्व संघटना मुळात कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी काम करतात एकत्रित येऊन एक मुखाने आपले ठराव पारित करून घेतात मग ती भिन्न जात भिन्न धर्म देश प्रदेश आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती. मता मतांचा गलबला


वरील मेसेजला अनुसरून  मला निश्चित स्पष्टता करावी वाटते की पोलीस स्टेशन मार्फत ज्या केसेस न्यायालयात दाखल केल्या जातात त्या जवळपास 80% केसेस हया सर्व सामान्य माणसावर अन्यायकारक असतात 

कारण की ज्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये कोणी वेक्ती एखाद्या वेक्तीच्या विरुद्ध FIR दाखल करतो त्यावेळी प्रथम पोलीस स्टेशनची जबाबदारी असते की ज्या वेक्तीच्या विरुद्ध FIR दाखल आहे त्या वेक्तीला नोटीस द्वारे पोलीस स्टेशनला बोलावून घेणे आणि त्या FIR संदर्भात पूर्ण माहिती देणे आणि त्या वेक्तीचे त्या FIR संदर्भात काय म्हणणे आहे ते सुद्दा क्रॉस तक्रारी स्वरूपात लिहुन घेणे.


जर चांगल्या वेक्तिवर असे खोटे आरोप होत राहिले तर तो आयुष्य भर  कोर्टाच्या चकरा मारीत राहणार  हे कितपत योग्य आहे

सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. ते अन्याय होऊ देणार नाहीत चांगल्या व्यक्तींचे रक्षण संरक्षण करून दुष्टांचा नायनाट करतील तशी अपेक्षा आहे. यामुळे सर्व सामान्य माणूस हा समाजात एक सामाजिक कार्य करत राहील  तो समाजात  आदरणीय सैनिक हृदय सम्राट  संदिप मेजर लगडसाहेब यांनी त्रिदलच्या महिला संघटनांच्या व पुरुष संघटनेच्या माध्यमातून आजी माजी सैनिक कार्य त्यांचं लय नेक क्रांतीचा फुंकला आहे त्यांनी शंख र.. एक नंबर त्रिदल सैनिक संघटना एक नंबर नांदेडचे सुपुत्र शहीद संभाजी कदम शहीद झाले त्यांचे नाव तालुका रुग्णालयाला देण्यात आले तेव्हाच मी भीमराव महादेव चाटे माजी सैनिक फॉरेस्ट ट्रेनिंग ऑफिसर ची ड्युटी करत असताना हा वाघ पाहिला जो सैनिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करत आहे आणि तेव्हाच मी सैनिक हृदयसम्राट ही उपमा सर्व नांदेड वासियांच्या समक्ष महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व सैनिक पदाधिकाऱ्यांच्या समक्ष दिलेली आहे आणि तोच सैनिक हृदय सम्राट संदीप भाऊ हा शब्द प्रचलित झाला आणि ते सत्य आहे ते सैनिक परिवाराच्या हृदयावर राज्य करतात म्हणून सैनिक हृदय सम्राट आहेत कुणी त्यांचा द्वेष करू नका. तुम्हाला मोठे व्हायचे जरूर  व्हा, त्यांच्यापेक्षा चांगलं कर्तुत्व करून दाखवा. त्यांना नाव ठेवून नाही? मी भारतीय माजी सैनिक संघटनेचा संघटक भारतीय नवजवान सेनेचा जिल्हाध्यक्ष त्रिदल सैनिक संघटनेचा प्रदेश सचिव परिवर्तन सैनिक संघटनेचा कोषाध्यक्ष सैनिक मित्र फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष गावपातळीपासून ते राष्ट्र पातळीवर सर्व आजी माजी सैनिकांनी एकत्रित यावे यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत राहणार कोणाला नाव ठेवणार नाही उतणार नाही मातणार नाही कोणतेही व्यसन करणार नाही खोटे बोलणार नाही आणि जे बोलतोय तसे वागत नसल्यास भर दीपावलीच्या दिवशी जरी माझा मृत्यू झाला तरी शोक करण्याचे कारण नाही कारण कर नाही त्याला डर कशाला मेसेज मोठा झाला आहे कोणी वाचणार नाही आणि ज्याने वाचला तो इंटरेस्टेड असेल त्यानेच हा मेसेज वाचला आणि मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला धन्यवाद आपलाच एक सेवक.