प्रदीप रघुते येणस
भाकप शाखा येणस च्या वतिने दिल्लीतील शेतकरी आंदोलानाच्या समर्थनार्थ केले शेतकरी परिषद चे आयोजन. केंद्रातील मोदी सरकारने आनलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे 10 महिण्यापुन शेतकली आंदोलन सुरु आहे या आंदोलनात 600 पैक्षा अधिक शेतकरी शहिद झाले आहे तरीही सुध्दा केद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी कायदै मागै घ्यायला तयार नाही , मोदी सरकार चे धोरण बड्या भांडवलदार यांच्या बाजुचे असुन शेतकरी विरोधी आहै . या विरोधात दिल्ली किसान मोर्चा च्या वतिने तिन काळे कृषी कायदै मागे घ्या विद्युत विधेयक २०२० मागे घ्या . किमान आधारभुत किमतीचा कायदा करा या न्याय मागण्या करिता २७ सप्टेबर २०२१ रोजी भारत बंद चे आवाहन केले आहै या आंदोलनाच्या समर्थनार्थ भाकप शाखा येणस च्या वतिने श्री. वंसतराव कडु यांच्या अध्यतेखाली शेतकरी परिषद चे आयोजन करण्यात आले होते , या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक शेतकरी नेते तथा भाकप चे सचिव कॉ. तुकाराम भस्मे , तसेच प्रमुख पाहुने किसान सभेचे नेते काँ. विनोद जोशी व काँ. विजय रोगडे उपस्थितीत होते.
दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन समाजातील प्रत्येक घटकांचे असुन केंद्र सरकार ने आणलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असुन २७ सप्टेबर २०२१रोजी होणार्या भारत बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाकप चे राज्य सचिव काँ तुकाराम भस्मे यांनी केले.शेतकरी परिषदेला गावातील शेतकरी - मजुर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी काँ. प्रफुल देशमुख, काँ.रामदास गायधने , काँ.योगेश कनसे, काँ.हरिदास देशमुख,काँ.अविनाश कणसे , काँ. शंकर ईखार , काँ. श्रिकृष्ण ईखार , सुनिता ईखार , उषा वैध्य , प्रितम गिरडकर काँ. संजय ईटनकर , काँ. विलास गिरडकर सह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते।
