Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ट्रकची दुचाकीला धडक; दोघे ठार

Responsive Ad Here

     प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे देऊळगाव राजा

       भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी देऊळगाव राजा शहराजवळील कुंभारी बायपास जवळ घडलेली या अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला आहे. रामप्रसाद एकनाथ चेके (50 रा नारायण खेड तालुका देऊळगाव राजा) त्यांची मुलगी वैशाली गणेश म्हस्के( 20 रा.बोरखेडी बावरा ता.देऊळगाव राजा)अशी त्यांची नावे आहेत.  रामप्रसाद चेके आणि त्यांची विवाहित मुलगी वैशाली म्हस्के हे दोघे दुचाकीने क्रमांक एम एच 28 ऐ एम 31 53 देऊळगाव राजा येथे दवाखान्यात आले होते. उपचार करून ते दोघे नारायणखेड या गावाकडे दुचाकीने परत जात होते.

     कुंभारी बायपास जवळ आल्यावर विरुद्ध दिशेने हा आलेला भरधाव ट्रक क्रमांक आर एल 14 जी एल 18 72 दुचाकीला जोराची धडक दिली यात वैशाली मस्के हिचा जागेवर मृत्यू झाला रामप्रसाद चेके यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला या प्रकरणी संतोष तुकाराम बनकर यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.