प्रदीप रघुते
केद्र सरकारच्या सत्ता काळात संघटीत - असंघटीत कामगार कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या करिता आयटक च्या नेतृत्वाखाली सतत संघर्ष करित आहे. यासंबधाने केंद्र सरकारच्या वतिने अनेकदा आश्वासन देण्यात आली पंरतु सरकारने ती अमंलात आनली नाही. असा कटू अनुभव सतत कामगार - कर्मचाऱ्यांना येत आहे .कामगारांनी संघर्षाच्या बळावर मिळविलेले 44 कामगार कायदे बदलविण्याचा व्यवहार हा कामगार विरोधी व कर्मचारी विरोधी धोरणाचा स्पष्ट पुरावा आहे .
कामगारांचे हक्क सुरक्षित रहावे. किमान वेतन कायद्याने सर्व योजना कर्मचार्यांना वेतन मिळावे , सामाजिक सुरक्षा व रोजगाराची हमी , राज्य सरकारने मान्य केलेले सर्व थकित मानधन त्वरीत देण्याबाबत च्या प्रमुख मागण्या करिता आयटक ह्या मध्यवर्ती कामगार संघटनेने दिंनाक 24 सप्टेबर 2021 रोजी देशव्यापी संपाचे आवाहना नुसार आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतिने आयटक नेते कॉ प्रफुल्ल देशमुख यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हारिषदेवर जोरदार निदर्शने केली .आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान वेतन सामाजिक सुरक्षा ,थकित मोबदला नाही ,कीमान वेतन नाही, सामाजिक सुरक्षा नाही .या बाबतीत सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहोत. गेली अनेक वर्षे सातत्याने आंदोलने चालू आहे तरीही कुठल्याच मागण्यांची पूर्तता होत नाही
गाव पातळीवर " आशा सेविका " आरोग्य व पोषणा च्या योजनांची अंमलबजावणी करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडत असतात. पंरतु आशांना मिळणारा मोबदला 2005 च्या दरानुसार असुन त्यामध्ये अध्यापही वाढ करण्यात आलेली नाही आशांना मिळणारे मानधन हे आरोग्य कर्मचारी च्या तुलनेत फारच अत्यल्प आहे. असा दुजाभाव योग्य नाही. तरी आशांना आरोग्य कर्मचाऱ्या प्रमाणे बरोबरीने वेतन मानधन मिळावे
आशा व गटप्रवर्तक महिलांना त्वरित सर्व प्रकारचे थकीत मानधन द्या. ईत्यादी मागण्यांकरिता भव्य निदर्शनै करण्यात आले व सरकारने त्वरीत मागण्यांची पुर्तता न केल्या तिव्र आंदोलन छैडण्याचा ईशारा आयटक संघटनेच्या वतिने देण्यात आला यावेळी जिल्हातील आशा व गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येने निदर्शने आंदोलन सहभागी झाल्या होत्या.
यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव काँ प्रफुल देशमुख ,सविता अकोलकर , सुषमा रहांगडाले , आशा गायगोले, विद्या रामटेके , ललिता ठाकरे, वनिता कडु , संगिता भस्मे , माधुरी अडोकार , ममता व्यवहारे , सविता भगत , संध्या सुले, वर्षा ठाकरे , ज्योती अग्रवाल ,सुनिता जंवजाळ सह मोठ्या संख्येंने आशा व गटप्रवर्तक उपस्थितीत होत्या
