Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अति पावसामुळे सोयाबीन पिक आले धोक्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

Responsive Ad Here

                       जयकुमार बुटे अमरावती  प्रतिनिधि 

संपुर्ण राज्यात चालु असलेल्या पावसामुळे शेतकरी सध्या तरी वैतागला आहे एकंदरीत अपेक्षा पेक्षा जास्त पाऊस होत असल्यादगाव खंडेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या अति पावसामुळे सोयाबीन पिकांची धानोरा गुरव व गौरखेडा परीसरामध्ये खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हाती आलेले पिक निघुन जाण्याची वेळ शेतकरी बंधु वर आली आहेत. पहीले कोरोणा न मारलं नंतर बोगस बियाणे व बियाण्यांच्या वाढलेल्या किमतीने त्यानंतर सोयाबीन चे भाव पाडून सरकार न मारलं  शेतात काही शिल्लक  होत.

 

     तर निसर्गाने मारलं अशी अवस्था सध्या शेतकरी वर्गाची झालेली आहेत वर्षभर कष्ट करून हाती आलेला घास सुद्धा मिळेल की नाही अशी अवस्था सध्या शेतकरी वर्गा ची झाली आहेत त्यातच सोयाबीन चे भाव दहा हजारा वरुन पाच हजार झाल्याने शेतीचा व शेतीला लावलेला पैसा तरी कसा वसुल होईल या विवंचेनेत शेतकरी अडकला आहेत..अतिवृष्टी झालेल्या भागात पालकमंञी तथा जिल्हाधिकारी यानी पाहणी करून सुद्धा सर्वै सुरू झाले नाहीत शेतकर्याच्या शेतात न जाता बाहेरूनच पाहणी करुन गेलेल्या अधिकारी वर्गाला शेतकर्याची व्यथा तरी काय समजणार आहे.विमा काढण्यास जसे आव्हान केले जाते तशी विम्याची रक्कम मिळवुन देण्यासाठी शासन व प्रशासन मदत का करत नाही असे खुप प्रश्न शेतकर्याना पडले आहेत तसेच अतिवृष्टी मुळे सोयाबीन पिकांचे व इतर पिकांची कृषी विभागाने त्वरीत पंचनामे करुन सरसकट कोणतीही अट न ठेवता  नुकसान भरपाई  देण्यात यावी असी प्रथम मागणी शेतकरी करत आहेत.