Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जवान श्याम शिंदे यांना वीरमरण

Responsive Ad Here

         चिखली : येथील जुने गाव परिसरातील श्याम प्रकाश शिंदे (वय ३५) यांना लष्करी कर्तव्य बजावताना लुधियाना येथे वीरमरण प्राप्त झाले आहे. शहराने गत महिन्यातच शहीद जवान कैलास पवार यांच्या रूपाने एक सुपुत्र गमावला आहे. त्यापाठोपाठ शहराने आणखी एक जवान गमावल्याची वार्ता शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक जुने गाव परिसरातील अंधारा महादेव मंदिर परिसरातील श्याम प्रकाश शिंदे लष्करी दलात सेवारत होते. लुधियाना येथे ते कार्यरत होते होते. ७ सप्टेंबर रोजी सकाळी परेड झाल्यानंतर त्यांना आकस्मिक चक्कर आल्याने ते जागेवरच कोसळले आणि तेथेच त्यांचे निधन झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 


   कर्तव्य बजावताना आकस्मिकपणे वीरमरण आलेले जवान श्याम शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, मोठा भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. लष्कारी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर स्व. श्याम शिंदे यांच्या पार्थिवावर चिखली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 2004 मध्ये सैन्यात भरती झालेले श्याम प्रकाश शिंदे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअर मध्ये वर्कशॉपला लुधियाना बटालियनमध्ये कर्तव्यावर होते आज त्यांना वीर मरण आले त्यांच्या पाठीमागे त्यांची आई कावेरी वीर माता वीरपत्नी स्वाती श्याम शिंदे मुलगा अनिरुद्ध शाम शिंदे मुलगा देवांश शिक्षण शिंदे मोठा भाऊ आनंत प्रकाश शिंदे शहिदाच्या परिवाराला दुःखातुन सावरण्याची ईश्वर शक्ती देवो त्यांच्या दुःखामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स पॅरामिलिटरी फोर्स सैनिक परिवार सामील आहेत सर्व सैनिक परिवाराकडून शहीद  जवानास भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी देऊळगाव राजा