Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मद्यधुंद पोलिसांचा महामार्गावर धिंगाणा गुन्हा दाखल

Responsive Ad Here
तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा 

   बीबी पोलीस स्टेशनच्या मद्यधुंद सहाय्यक यासह पोलिसांनी महामार्गावर वाहन आडवे लावुन तुफान डान्स केला आहे.  त्यांच्या या कारणांमुळे महामार्ग तब्बल चाळीस मिनिटे वाहतूक जाम झाली.यांच्या शेकडो वाहनधारकांनी फटका बसला. अखेर या महामार्गावर पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे.ज्यांनी जनतेला शिस्त लावायची त्यांनीच पोलिसांची स्थितीचे पायमल्ली केल्याने पोलिसांनी नाचक्की होत आहे. त्यांचे असे झाले की बीबी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय सुखदेव पवार व त्यांचे इतर सहकारी मद्यधुंद अवस्थेत देऊळगाव राजा चिखली महामार्गावर सरंबा फाट्यावर रस्त्यावर मध्यभागी पोलीस वाहन उभे करून डान्स करू लागली.
    त्यांच्या बेधुंद डान्समुळे रस्त्यात दोन्ही बाजूला वाहने थांबली  तब्बल चाळीस मिनिटे हा प्रकार सुरू होता याच दरम्यान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे आपल्या वाहनाने बुलढाणा कडे येत होते. सरांबा फाट्यानजीक पुढे महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता तर त्यात मधोमध पोलीस लिहिलेली पाटी असलेली mh28 ऐ.एन 36 41 क्रमांकांच्या पांढऱ्या रंगाच्या कारसमोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते. यात  बिबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पवार व त्यांचे दोन साथीदार असल्याची माहिती आहे.

   सदर घटनेबाबत पोलिसांनी विजय सुखदेव पवार वय 65 वर्ष राहणार धमन तालुका खामगाव पोस्ट बीबी योगेश गोविंद राठोड वय 38 वर्षे राहणार बीबी तालुका लोणार रामदास खुशालराव गावडी वय 45 वर्षे राहणार ह ता तालुका लोणार यांच्याविरुद्ध नंबर 394 कलम 283 भा द वि कलम 85 मुंबई दारूबंदी कलम 110. 117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.