गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव
तोंडापूर येथील खडकी नदीच्या बंधाऱ्यातील पुरात वाहून गेलेल्या शेख मुसा शेख साहिर यांच्या घरी सांत्वन भेट
जामनेर तालुक्यात ओझर सामरोद टाकळी गावासह अनेक गावात अतिवृष्टीमुळे गावाचे नुकसान झाले आहे
जामनेर तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात १८ गावांमधील सुमारे १८० घरांची पत्रे उडून गेली असून काही दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तर या गावांमधील शेती शिवारातही मोठी हानी झाली आहे. सामरोदसह परिसराचा संपर्क जगाशी तुटला असून या आपत्तीत एक तरूण बंधार्यातील पाण्यात वाहून गेला आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज ओझर व हिंगणे नुकसान झालेल्या परिस्थितीची आज सकाळी शेतावर जाऊन शेतकऱ्यांची माहिती घेतली पत्रकारांशी बोलताना नामदार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीगुलाबराव पाटील म्हणाले की कालच मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला असून नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार असे सांगितले नामदार गुलाबराव पाटील जामनेर चे आमदार गिरीश भाऊ महाजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील शिवसेनेचे प्रसिद्ध प्रमुख गणेश पांढरे जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे राष्ट्रीय काँग्रेसचे शंकर राजपूत दीपक सिंग राजपूत डी के पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील आणि जामनेरच्या तहसीलदार अरुण शेवाळे गट विकास अधिकारी ज्योती कड देवी यांच्यासह शासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते संवाद साधून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश दिलेत. विशेष करून अतिवृष्टग्रस्त भागांसाठी कोरोनाच्या अतिरिक्त १७ हजार लसी देण्यात आल्या असून आवश्यक असणार्या औषधी आणि फवारणीची तरतूद करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर ना. पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेने अतिवृष्टीनंतरच्या रोगराईला आळा घालण्यासाठी काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
महसूल प्रशासनाने दिवसभर नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक अंदाज एका विवरणपत्राच्या माध्यमातून जाहीर केला आहे. या विवरणानुसार जामनेर तालुक्यातील १७ गावांमध्ये हानी झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. यात हिंगणे न.क.- सुमारे २० घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ओखर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी ४० घरांची पत्रे उडाली आहेत. रामपूर येथे १० तर लहासर येथे १५ घरांची पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. ढालशिंगी येथे चार घरांची अंशत: पडझड झाली असून जुनोन येथे एका घराची भिंत कोसळली आहे. तळेगाव आणि पहूर येथे अनुक्रमे ९ आणि ८ दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. टाकळी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाची पत्रे उडाली आहेत. या सर्व गावांमध्ये सुमारे १३० घरांची पत्रे उडाल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे. नांद्रा हवेली गावातील एका संपूर्ण गल्लीत पूराचे पाणी शिरले आहे.
यासोबत मेणगाव, टाकळी बुद्रुक, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी आणि तिघ्रे वडगाव या गावांच्या शिवारातील पिकांचे वादळ आणि मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने आपल्या विवरणपत्रात नमूद केला आहे.
. मात्र याबाबतचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आलेले आहेत.
दरम्यान, सायंकाळपर्यंत सामरोद, ओझर, टाकरखेडा आदी गावांचा जगाशी असणारा संपर्क तुटला आहे. फत्तेपूर ते तळेगावच्या दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे. आज तोंडापूर येथील खडकी नदीच्या बंधार्यातील पाण्यात शेख मुसा शेख साहीर (वय ३० वर्षे वय) हा तरूण वाहून गेला.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज तोंडापूरशेख मुसा शेख साहेब याच्या घरी सांत्वन भेट दिली याप्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील राष्ट्रवादी नेते संजय गरुड गणेश पांढरे साडुमामा गुरव गावातील सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
