Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भिवापूर तलाव फुटण्याची भीती

Responsive Ad Here

संजय पवार अमरावती प्रतिनिधी

        आ. रवि राणा यांनी रात्रीच्या वेळी  धोक्याचे गंभीरता ओळखून अधिकाऱ्यांना घेऊन मोक्यावर जाऊन केली पाहणी

      सततच्या  पाऊस सुरू असल्याने भिवापूर पुरातन तलाव पूर्णतः भरल्याने तो तलाव फुटू शकतो या गंभीर स्थितीची पाहणी आता रात्रीच्या वेळी आमदार रवि राणा यांनी जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांना भिवापूर तलाव मोक्याची पाहणी करण्यासाठी नेले.  सतर्कतेचा ईशारा अऱ्हाड,कुऱ्हाड, उतखेड, पारडी या गावातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा ,खबरदारी घेण्यासाठी लोकांना सूचना दिल्या आहेत आमदार  रवि राणा यांचे सोबत उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार काकडे, नायब तहसीलदार बढिये , वन परीक्षेत्र अधिकारी भुंबर, जलसंपदा उपविभागीय अभियंता सावन्त, जिल्हा परिषद पाठबन्धरे पातूरकर, डहाके 

     मंडल अधिकारी उगले व वरिल गांवचे  संबंधित  तलाठी या वेळी आमदार रविभाऊ राणा यांच्या सोबत दौऱ्यावेळी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे सदरचा तलाव तुडुंब भरलेला असून आजूबाजूच्या  गावातील   नागरिकांना जिल्हा प्रशासन तर्फे गाव सोडण्याचा इशारा दिलेला आहे. आपत्ती निवारण विभागाची टीमला सज्ज ठेवण्यात आले आहे.आमदार रवि राणा यांनी वरिल घटनेची माहिती   मा. विभागिय आयुक्त व जिल्हाधिकारी मॅडम यांना दिली असून ते सुद्धा या प्रकरणी लक्ष ठेऊन आहेत.