रविंद्र तायड़े तालुका प्रतिनिधि जामनेर
जामनेर तालुक्यतिल देवळसगाव येथे दिनांक 6-9-2021 सोमवार रोजी सकाळी झालेल्या चक्री वादळामुळे देवळसगाव शिवारात शेतातील मक्का,कपाशी व फळबाग ह्या पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे . तरी आज दिनांक 10-9-2021 शुकवार रोजी देवसळगाव मध्यें कृषि सहाय्यक् ए. एच.तड़वी साहेब व तलाठी चेतन ताथे साहेब पोकरा अधिकारी कोरे साहेब कोतवाल प्रकाश शिंपी हे सर्व अधिकारी गावामध्ये
येऊन देवळगांवचे उपसरपच रविंद्र तायडे ग्रामपंचायत सद्स्य उमेश इंगळे व गावाचे पोलिस पाटिल वासुदेव नाईक यांना संगतीला घेऊंन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले व ग्रामपंचायत यथे सर्व अधिकारी आले असता सर्व गावातील व बाहेर गावातील शेतकयानी त्यांना काहीं प्रश्न व समस्या विचारल्या असता सदर अधिकारी कृषि सहायक ए. एच.तड़वी साहेब व तलाठी चेतन ताथे साहेब यानी सर्व शेतकर्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊंन त्यांच्या समस्या सोडविन्याचा प्रयत्न केला व कृषि विषयक विविध योजनाचे मार्गदर्शन केले.
