तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार
आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रा प जवळा असून येथे 15 सदस्य असून आज रोजी गावाची 15 हजारावर लोकसंख्या असून गेल्या कित्येक दिवसापासून सत्ताधारी व विरोधक यांच्यात मोठा संघर्ष चालू आहे त्यामुळे गावात विकासाची पार वाट लागली आहे गावाला गठारीचे स्वरूप आले आहे ग्रा प ने गावामध्ये मोठ्या प्रमाणात मुरूम टाकले आहे पण प्रत्येक्षात टाकलेल्या मुरमा पेक्षा जास्त मुरूम दाखवून मोठ्या प्रमाणात देयक उचलण्यात येत आहे अशी विचारणा ग्रा प च्या 10 सदस्यांनी सभागृहात केली सोबतच गावातील वार्ड नंबर 1 मधील मोठ्या संख्येने नागरिकानी ग्रा प मध्ये येऊन मुरमाची चॊकशी केली असता ग्रा प ने भ्रष्टाचारा चा कळस गाठला आहे असे निदर्शनात आले आहे गावामध्ये आवश्यक नसलेले काम मोठ्या प्रमाणात करून मोजके सदस्य आपसात वाटून घेत आहे विशेष म्हणजे 15 पैकी 10 ग्रा प सदस्य यांनी विरोध करून सुद्दा सचिव काहीच ऐकत नसून नियम बाह्य खर्च करून माया जमवत आहे अशी तक्रार सुद्दा सदस्यांनी गटविकास अधिकारी आर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि प यवतमाळ,विभागीय आयुक्त अमरावती,
सर्कल च्या जि प सदस्यांना सौ किरण मोघे याच्या कडे सुद्दा कित्येक वेळा तक्रार केली आहे मात्र आज पर्यत साधी चॊकशी सुद्दा ग्रा प मध्ये आली नाही त्यामुळे सत्ताधारी मुजोर झाला असून आमचे कोणीच काही करू शकत नाही या तोऱ्यात वागत आहे गावामध्ये आज रोजी स्वच्छ ते चा मोठा प्रश पडलेला आहे गेल्या कित्येक वर्षा पासून सांडपाणी ,पाणीपुरवठा ,दिवा बत्ती, अतिक्रमण, घरकुल लाभार्थी अश्या खुप समश्यां गावामध्ये असून सुद्दा काही पदाधिकारी केवळ खिरापत वाटपासाठी ग्रा प मध्ये समाश्या निर्माण करत आहे तरी वरील या सर्व बाबी वर लक्ष देऊन समंधीत वरिस्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे
प्रतिक्रिया
सचिव ग्रा प जवळा श्री चंद्रशेखर पिलावन सदस्या मध्ये समनव्यय नसल्यामुळे विकास कामांना अडचणी निर्माण होत आहे आपसी मतभेदांमुळे विकास कामे अर्धवट होत आहे
धीरज गावंडे सदस्य ग्रा प जवळा सचिव हे कोणाचे ऐकत नसून ग्रा प मध्ये मनमानी चालू असून गावातील जवळच्या वेक्तीच्या नावाने मोठ्या प्रमाणात धनादेश देऊन परस्पर माया जमवत असून विकास कामाचे तीन तेरा वाजवले आहे
