मलकापूर प्रतिनिधी
मागील दीड वर्षापासून ब्लॅकमेल करून केले जात होते शारीरिक शोषण परिवारातील सदस्यांना मारून टाकण्याच्या दिल्या जात होत्या अल्पवयीन मुलीला धमक्या अशी खळबळजनक घटना शहरातील बस स्थानक परिसरात राहणारा भूषण गजानन बोरसे याने केली आहे. या अल्पवयीन मुलीवर गेल्या दिड वर्षापासून या नराधमाने इतर दोन मुलींच्या सह्यायाने ब्लॅकमेल करून वेळोवेळी तोडले अब्रूचे लचके.
अंगावर काटा आणणारी ही घटना असून १५ वर्षीय मुलीला आपल्याच परिसरातील २ मुलींच्या सहायाने पीडित अल्पवयीन मुलीला फोन कॉल्स वर धमकावून गेल्या वर्ष दीड वर्षात शारीरिक शोषण केले असल्याची फिर्याद शहर पोलिस स्टेशन ला दिल्या गेली. फिर्यादी नुसार पीडित अल्पवयीन मुलीला तिच्याच शेजारी राहणाऱ्या दोन मुलींनी आरोपी भूषण बोरसे याच्यासोबत बोलने करण्यासाठी प्रोत्साहित केले.
या घटनेचे रूपांतर हळू हळू खोट्या प्रेमाच्या आणाभाका व पीडितेच्या परिवारातील सदस्यांना जिवे मारण्याच्या धमकावणेतून शारीरिक संबंध बनवण्याची घटना घडली आहे. पिडीतेसोबत या नराधमाने कधी त्याच्या आदर्श नामक सलून दुकानात तर कधी गांधी चौकातील बंद पडलेल्या आदर्श बालक मंदिर म्हणून नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळेच्या खोल्यांमध्ये त्या पीडितेच्या अब्रूचे लचके तोडन्याचे क्रुकृत्य करत होता.
हा सर्व घटनाक्रम दाबण्याचा आग्रह त्या दोन सह आरोपी मुलींनी केला. म्हणून आरोपी त्याच्या कृकृत्याला वारंवार साकार करण्यात यशस्वी राहत होता. गेल्या चार आठ दिवसांपूर्वी सुद्धा या आरोपी सोबत सह आरोपी यांचे पिडीतेसोबत वाद सुद्धा झाले होते .त्या वादामध्ये पीडितेच्या परिवाराला व पीडितेला तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याचे सुद्धा धमकावल्या गेले आहे. या वादातून च घटना उघडकीस आल्याने पीडितेच्या आई वडीलांनी पीडितेला घेऊन शहर पोलिस स्टेशन गाठले व फिर्याद दिली त्यानुसार आरोपीला आज रोजी पकडून गजाआड टाकले. व त्यावर अपराध क्रमांक ५५७/२०२१ कलम ३७६ (२), ३५४, ५०६/ ३४ आयपीसी सह कलम ४ बाल लैंगिक अपराध संरक्षण अधीनियम २०१२ नुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास api स्मिता म्हासाळे ह्या करीत आहेत.
अश्या कू कृत्याला समाजातील अल्पवयीन मुली बळी पडण्याचे नेमके कारण शोधले असता असे लक्षात येते की अश्या नराधमांच्या पाठीवर कुठतरी राजकीय नेत्यांचा वाचविण्याचा हात असतो म्हणून या नराधमांना असे कू कृत्य करण्याचे बळ येते त्यामुळे अश्या अल्पवयीन मुली बळी पडत असतात परंतु समजतील हीच फार मोठी शोकांतिका आहे.