भिमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
मित्र फाऊंडेशन देऊळगाव राजा कडून नगरपालिका हद्दीमध्ये शेतकऱ्याची पिळवणूक थांबावी यासाठी मागणी . सविस्तर वृत्त असे की देऊळगाव राजा तालुक्यामध्ये पंचवीस तीस किलोमीटर वरून शेतकरी भाजीपाला फळे घेऊन येतात ,त्यांचे हराशी चा टाईम सकाळी चार वाजता होता या प्रक्रियेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची रस्त्याने अडवणूक झाली, त्यांना मार खावा लागला, त्यांचे पैसे काढून घेतले, काही शेतकऱ्यांचे अक्सिडेंट झाले रोडवर पडले. काही छोट्या महिला व्यवसायिकांचे हाराशीचे सामान घेण्यास रात्रीच येत असताना त्यांच्या पाठीमागे कुत्रे लागले आणि चोरांनी त्यांना लुबाडले अशा घटना घडत असताना ,आपला स्वार्थ बाजूला ठेवून हराशी आडत यांनी सकाळी सहा वाजेच्या अगोदर कोणतीही हरासी बोली पुकारू नये, तसे केल्यास त्यांना दंड करण्यात येईल. असे सर्वानुमते दोन्ही हात वर करून ठरले आहे .उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला भाजीपाला पिकवण्यासाठी रात्रीचे लाईट पर्याप्त उपलब्ध असते ,दोन तीन चार महिने मेहनत करून खतपाणी घालून भाजीपाला फळे मोठाली करायची आणि रात्री तीन वाजता घेऊन ते तालुक्याच्या गावाकडे निघायचं. नाव शेतकरी राजा पण, फळे भाजीपाला चोरासारखा अंधारात दलालांनी रात्री चार वाजता हराशी करून विकायचा. ही शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी बरेच जण नुसते बोलायचे , एकमेकावर बोट दाखवायचे परंतु स्वार्थापोटी समोर कोणी येत नव्हते. पारदर्शकता व्यवहार करत नव्हते
असे दिसून आले. अपघात चोरी लबाडी व पिळवणूक ह्या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी जय जवान जय किसान नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी व अहिंसात्मक मार्गाने आंदोलन नाही करणारे महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2021 पासून पारदर्शिता हराशी ची अंमलबजावणी होईल व सहा वाजेनंतर हराशी पुकारले जाईल. या मा सैनिक मित्रांच्या मांडलेल्या विचारांची सर्व सहमत झाले जालना औरंगाबाद सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून आडत घेतली जात नाही इथे दहा टक्के आडत ही गरीब शेतकऱ्यांची सुद्धा बंद व्हावी यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या ह्या गोष्टीच्या विरोधात ज्यांचे मत असेल त्यांनी 80 5556 8866 वर आपले मत नोंदवावे , निवेदनावर जवान, किसान, अडते, छोटे व्यावसायिकांकडून सह्या दिल्या आहेत जय हिंद .
