तालुका प्रतिनिधी गणेश एकंवार जवळा
आर्णी पोलीसाचा ताफा ग्रामसभेमध्ये हजर सत्ताधाऱ्यांचे सभा सोडून पलायन
आर्णी तातुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामच्यायत मध्ये दिनांक 8/10/2021 ग्रामसभा घेण्यात आली या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सुरळीत चालू असलेल्या सभेमध्ये अचानक गावामधील महाराष्ट्रार ग्रामीण रोजगार योजनेमधून प्रधामिक आरोग्य केंद्र येथून आठवडी बाजार या लोकेशन पर्यत उघडी गटार चे काम अंदाजे1,50,000 रु करण्यात आले
परंतु प्रत्येक्षात हे कामच अस्तित्वात नाही त्यामुळे नाली चोरी गेली नाली चोरी गेली असा गदारोळ सभेमध्ये झाला त्यामुळे सभेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले काही नागरिकांमध्ये हमरीतुमरी निर्माण झाली आर्णी पोलीस चे पी एस आय श्री झायले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्याने सभेमध्ये शांतता निर्माण केली व सभा संपली असे जाहीर केले या वेळेस ग्रा प चे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते तसेच गावातील विनोद पंचभाई, संजय चोपडे, संतोष चोपडे, आशु निरपासे, धीरज गावंडे गजानन धनोडे, संतोष राऊत, उमेश धाये , शुभम गुल्हाने ,रामटेके सर, आसिफ शेख,, राजेश शेलोकर,कैलास कोटमकर, कैलास एकडवार, गजानन हटवार त्याच बरोबर गावातील मोठ्या संख्येने उपस्थिती होती।
प्रतिक्रिया
सचिव श्री चंद्रशेखर पिलावन गावामधील नाली च्या कामामुळे सभागृहात गदारोळ झाला आहे काम केले नसून सुद्दा दीड लक्ष रूपये उचलण्यात आले आहे प्रत्येक्षात मात्र प स ने समाधीत ठेकेदाराकडून खोटे नमुना चार भरून पैसे काढले आहे याची पूर्ण चोकशी करून कारवाईची मागणी करू