जयकुमार बुटे अमरावती प्रतिनिधी
अमरावती ते आर्वी रोडवर एसटी महामंडळच्या चालत्या गाडीचे तुटले एक्सल अमरावती च्या डेपो क्रमांक दोन या डेपोचे मॅनेजर भिवरे साहेब आहे तसेच या बस क्रमांक आहे MH 14 .BT .0896, या गाडीचे मेन्टेनन्स झाल्यावर तुटला एक्सेल
काल दुपारची आर्वी रोड वरील घटना अमरावती वरून 25 किलोमीटर अंतरावर मार्डी येथील चालत्या गाडीचा अचानक एक्सल तुटल्याने एसटीच्या मागे काही अंतरावरच दुचाकी गाड्या होत्या दुर्घटना एवढी गंभीर झाली असती की प्रवाशांना आणि ड्रायव्हर ला सुद्धा जीव गमवावा लागला असता, दुर्घटना टळली असून कोणतीही दुर्घटना झालेली नसून
मात्र या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न एसटी मध्ये प्रवास करणारे प्रवासी करत होते प्रवाशांनी ड्रायव्हरला विचारले असताना ड्रायव्हरने कालच MH 14 BT 0696 अमरावती आर्वी या मार्गाच्या गाडीचे मेंटेनन्स झाले असे प्रवाशांना सांगण्यात आले या सर्व घटनेला डेपो मॅनेजर तसेच मेन्टेनन्स कर्मचारी आहे असे बसमधल्या प्रवाशांचे म्हणणे होते तसेच भविष्यात अशी घटना होऊ नये याची डेपो मॅनेजर नी दखल घ्यावी असे सगळ्या प्रवाशांचे म्हणणे पडले.