भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
एकाच दिवशी जन्मले, दोन पुरुष महान
एक झाला उंच, दुजा राहिला लहान
एकाची आरती, रघुपति राघव राजाराम
दूजाची कृती, जय जवान जय किसान
एकाचा स्वातंत्र्यासाठी अहिंसक सत्याग्रह
दुजाचा फक्त खऱ्यासाठी आश्वासक आग्रह
एकाला जगाने म्हटले आधुनिक बुद्ध
दुजाने शांतपणे जिंकले, देशावरचे युद्ध
दोघांचे जीवन सार्वजनिक अन् मृत्यु अकस्मात्
एकाची सर्वांदेखत हत्या, दुजाचा गुपचुप अपघात
एकाचा खुनी जगाला कारणासाहित कळला
दुज्याच्या नावाचा मुद्दाही राजकारणात गळाला
एकाचे उभारले देशभर पुतळे
दुजाचे नावही क्वचितच कळे
एक आता रोज पैशाच्या सगळ्या नोटांवर हसतो
दुजा दरवर्षी फक्त एकदाच पेपरात फोटोमध्ये दिसतो
एकाचे विचार महान पण आचरतो कोण
दुजाचे आचार महान पण विचारतो कोण
देशाचे दोन अनमोल रत्न
आयुष्यभर देशसेवा प्रयत्न
एक झाले राष्ट्रपिता दुसरे पंतप्रधान
दोघांनाही आम्ही स्मरतो साकारतो घोष तो जय जवान जय किसान
माझा भारत देश महान माझा भारत देश महान
महाराष्ट्र सैनिक करिअर अकॅडमी देऊळगाव राजा कडून दोघास विनम्र अभिवादन माझा भारत देश महान मा भारत देश महान जय हिंद
