नेवासा प्रतिनिधी
नेवासा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री विठ्ठल काळे सर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी शहाली शाळेसाठी एक संगणक टेबल व चार खुर्च्या भेट दिल्या... याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य प्रतिनिधी श्री.रामेश्वर चोपडे सर, गुरुमाऊली मंडळाचे सल्लागार श्री.बापूसाहेब सोनवणे, केंद्रप्रमुख श्री.नामदेव शिरसाट साहेब, शा.व्य.स. अध्यक्ष श्री.नारायण उऱ्हे, केंद्र मुख्याध्यापक श्री.कैलास धानापुणे, ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक श्री.रमेश राऊत, श्री
प्रसाद कुलकर्णी, श्री. जयप्रकाश राशिनकर, शालेय सहकारी श्री.संतोष दहिवळ, श्री.नवनाथ काळे, श्री.संजय अंधारे, श्री.नितीन वाघमारे, श्रीमती सीमा शहाने, श्रीमती आरती वाकचौरे उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सरांना कवितारुपी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच श्री.काळे सर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक भावनेतून "शरणपूर वृध्दाश्रम" बांधकामासाठी २१०० रू. मदत दिली.या मदतीचा स्वीकार करताना शरणपूर वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री.रावसाहेब मगर यांनी केला. यावेळी पत्रकार मित्र श्री.सुधीरभाऊ चव्हाण, गुरुमाऊली मंडळाचे उत्तर जिल्हाप्रमुख श्री.अरविंद घोडके, गुरूमाऊली मंडळाचे सल्लागार श्री.बापूसाहेब सोनवणे, जिल्हा संघ उपाध्यक्ष श्री.शिवाजीराव घुले, उच्चाधिकार समिती सदस्य श्री.विजय करवंदे, मंडळाचे तालुका सरचिटणीस श्री.संतोष रासकर, संघाचे तालुका कार्याध्यक्ष श्री.प्रविण सोनवणे, संघटक श्री.जयप्रकाश राशिनकर, तालुका उपाध्यक्ष श्री.अण्णासाहेब शिंदे, आदर्श शिक्षक श्री.संतोष भांबरे सर, पीएसआय मित्र श्री.किशोर जाधव सर, उपक्रमशील शिक्षक श्री.अनिल टेकने सर उपस्थित होते.