अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे
स्थानिक नवाथे नगर अमरावती या ठिकाणी डॉक्टर वासंती कडू यांचे हॉस्पिटल आहे या ठिकाणी दिनांक आज रोजी आठ ऑक्टोंबर ला स्वाती निलेश राऊत मुक्काम नेरपिंगळाई तालुका मोर्शी जिल्हा अमरावती या काल सकाळी प्रस्तुती करिता यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती सकाळी पाच वाजता दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी दुपारी बारा वाजता चेकअप केल्यानंतर स्वाती राऊतला सांगण्यात आले डिलिव्हरीला वेळ आहे आणि काही वेळानंतर तिच्या पोटामध्ये त्रास व्हायला लागला .
नातेवाईकांनी डॉक्टरला आवाज दिल्यानंतर डॉक्टर कडू यांनी नर्स अर्चना वानखेडे यांना स्वातीला इंजेक्शन देण्यात सांगितले आणि त्यानंतर स्वातीचा पोटामध्ये जास्त त्रास होऊ लागला त्यानंतर लगेच डॉक्टर कडू यांनी स्वातीला डिलिव्हरी करिता नेण्यात आले अर्ध्या तासाने स्वातीला मुलगा झाला व दगावला सांगण्यात आले नातेवाईकांना माहित पडल्या नंतर त्यांनी हॉस्पिटल ला गर्दी करण्यात आली.
डॉक्टर वासंती कडू यांनी संबंधित राजापेठ पोलिस स्टेशन यांना कळवण्यात आले त्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नातेवाइकांना हॉस्पिटलच्या बाहेर करण्यात आले दोन्ही बाजूने रिपोर्ट झाल्यानंतर पूर्ण बाजू ऐकल्यानंतर बाकीचा तपास राजापेठ पोलिस स्टेशन करत आहे नातेवाईकांना पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याची वाट बघण्यात सांगण्यात आले आहे त्यानंतर आम्ही बाकी जी कारवाई करू असे सांगण्यात आले आहे.