Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

देऊळगावराजा नगर पालिकेतील बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करा-शेख कदीर

Responsive Ad Here

 देऊळगाव राजा प्रतिनिधी

अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा

देऊळगावराजा नगर पालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेवरच कार्यालयात यावे यासाठी या नगरपालिकेमधील बायोमेट्रिक  यंत्रणा व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यालयात करावे अशी मागणी देऊळगा राजा मनसेचे माजी शहराध्यक्ष शेख कदीर शेख चाँद यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर यंत्रणा सात दिवसांचे आत कार्यान्वित न झाल्यास लोकशाही मार्गाने व मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे. 


   देऊळगावराजा येथील नगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सद्यस्थितीत या नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे येथील कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत आहेत हे कर्मचारी व अधिकारी मनाला वाटेल तेव्हा पालिकेत येतात व मनाला वाटेल तेव्हा पालिकेतून गायब होतात यांना कोणीही जाब विचारणारा नसल्यामुळे हे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात आढळत नाहीत. यदाकदाचित कोणी विचारणा केली तर हे कर्मचारी थातूरमातूर कारण सांगून मोकळे होतात. हे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यात आढळत नसल्यामुळे अनेक नागरिकांची महत्त्वाची कामे खोळंबल्या जातात व त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे झाले आहे.

         या अगोदर नगरपालिकेमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित होती परंतु ही यंत्रणा अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणीची ठरत असल्यामुळे ही यंत्रणा अकार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे हे अधिकारी व कर्मचारी मनाला वाटेल तेव्हा कार्यालयात येऊ लागले व मनाला वाटेल तेव्हा कार्यालयातून जाऊ लागले. त्यामुळे कामानिमित्त नगरपालिकेत आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.

        या पालिकेतील बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करून या बायोमेट्रिक यंत्रणेमध्ये सकाळी कार्यालय उघडण्याची वेळ, दुपारी लंच टाईम, दुपारी कार्यालय सुरू होण्याची वेळ व सायंकाळी कार्यालय बंद होण्याची वेळ अशा पद्धतीने थंब  घेण्याचा प्रोग्राम कार्यान्वित करावा अशी मागणीही सदर निवेदनातून करण्यात आलेली आहे. सदर यंत्रणा सात दिवसांचे आत कार्यान्वित न झाल्यास मनसेच्या वतीने लोकशाही मार्गाने व मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेख कदीर शेख चाँद यांनी दिला आहे.