मलकापूर प्रतिनिधी
वाशिम येथील राज्य स्पर्धेत बुलडाणा संघ खेळणार या स्पधेतून महाराष्ट्र संघ निवडला जाणार
मलकापूर :- महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत व वाशिम जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८ वी सबज्युनिअर सॉफ्ट टेनिस अजिक्यपद स्पर्धा मुले व मुली राज्यस्तरीय स्पधेचे आयोजन वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल वाशिम दि २२ ते २१४ ऑक्टोबर दरम्यान वाशिम येथे आयोजीत करण्यात आलेले आहेत.
सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी बुलडाणा जिल्हा संघाची जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पधेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते . सदर स्पर्धेतून प्राविण्यप्राप्त खेळाडु खालीलप्रमाणे असून हेच खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार असून निवड चाचणीतूनाही काही खेळाडूची निवड केली गेली असून जिल्हा संघाची घोषणा सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असो चे अध्यक्ष संतोष बोरगावकर व कार्याध्यक्ष राजेश महाजन यांनी नुकतीच जाहीर केली
.
सबज्युनिअर मुले
मनीष वरोडे, द्यानेश कदम, मंथन जेन, तनिष्क तायडे , मंथन कदम , सार्थक जोगदंड, श्रेयस पाटील , यश खर्चे .प्रशिक्षक. प्रवीण मानमुडे व्यवस्थापक शिरीष खराडे .
सबज्युनिअर मुली
कु विनिता खेदक, कु.देवश्री जगताप, कु.सुस्री होले कु.जानवी खर्चे, कु भक्ती क्षीरसागर, कु.पलक परदेशी कु.प्रिया पाटील. कु स्वरा देशमुख. प्रशिक्षक विवेक जाधव, व्यवस्थापक हेमलता जगताप
सॉफ्ट टेनिस स्पोर्टस असोशिएसन बुलडाणा व परिजा स्पोर्टस क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धा दि १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९ वाजेपासून परिजा स्पोर्टस क्लब खामगाव येथे बुलढाणा जिल्ह्यातील एकूण २८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला असुन यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंची जिल्हा संघात निवड करण्यात आली असून या खेळाडूंचे दि १८ ते २१ ऑक्टोबर प्रशिक्षण सुरू होणार असून तसेच स्पर्धेच्या अधिकृत माहितीसाठी विजय पळसकर सचिव सॉफ्ट टेनिस असोसिएशन बुलढाणा यांच्याशी संपर्क साधाव असे आवाहन राजेश्वर खंगार यांनी केले आहे.