Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भालेगाव ग्रामपंचायती तील कार्यकारिणी चा भोंगळ कारभार*

Responsive Ad Here

 मलकापूर प्रतिनिधी

भालेगाव शिवारात गट न.71 याचे क्षेत्रफळ 1.21आर हे शेत सत्यशीला मधुकर पाटील यांच्या मालकी चे असून शेताचे बांधावर एम आर जि एस योजने अंतर्गत वृक्ष लागवडीसाठी अर्ज केला असता यात कुठलीही लागवड बांधावर करण्यात आली नाही मग याची चौकशी करण्यासाठी गेलो असता त्यात माझ्या शेतात वृक्ष लागवड झाल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाले पण माझ्या शेतातील बांधावर कुठेही वृक्ष दिसत नाही.



 अर्थात या ग्रामपंचायत कार्यकारिणीने ती लागवड केली मग ती वृक्ष कुणी चोरून नेली नाही न असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्या लागवडी साठी माझ्या नावे सदर योजनेचा लाभ घेतल्याचे दाखवून 26784/- रुपयांचा अपहार करून सदरहू रक्कम ही कार्यकारिणीने तयार केलेली खोट्या मजुरांच्या नावाच्या मस्टरवर खोट्या सह्या करून कुठलेही काम न करता त्या मजुरांच्या नावे असलेल्या अकाउंट वर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

      व त्या निमित्ताने आपसात साठगाठ करून पैसे वाटून घेतल्याचे या तक्रारीत म्हटले आहे जर खरच असे काम रोजगार हमी योजने अंतर्गत जर चालत असतील तर ही शासनाची फसवणूकच केली जात आहे यात जेवढे दोषी ही कार्यकारणी आहे तेवढेच दोषी या संबधीत अधिकारी सुध्दा आहेत या घटनेची दखल मलकापूर तालुका दंडाधिकारी यांनी घ्यावी.या योजनेचे गैरवापर थांबवावे व त्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी चर्चा भालेगाव ग्रामस्थ करीत आहेत.