Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सातुर्णा येथील संपूर्ण महिला व नगरिकांचा महानगर पालिकेवर धडक मोर्चा

Responsive Ad Here

 अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे 


महानगरपालिकेचे मुलांचे ओपन प्लेस खेळाच्या मैदानावर औद्योगिक  कारखाना साठी सातुर्णा येथील केला ताबा

   नवीन सातुर्णा येतील कित्येक वर्षापासून लहान मुलांसाठी ओपन प्लेस जागाही महानगरपालिका कडून सोडण्यात आली होती त्या ओपन प्लेसमध्ये आधी लहान मुलांचे विविध प्रकारचे खेळणे महानगरपालिकेच्या विकासा मधून बसवण्यात आले होते काही महिन्यापासून एक एक सामान करून पूर्ण खेळण्याचे सामग्री तेथून हलविण्यात आले.


  2 ते 3 वर्षानंतर औद्योगिक वसाहत सातुर्णा एमआयडीसी यांनी या ठिकाणचे खेळणे हे रातोरात काढून त्याठिकाणी वालकट कंपौंड बांधण्याचे काम अनधिकृतपणे सुरू करण्यात आले होते सदरची जागा ही महानगरपालिकेची असतांना सिद्धा जागेवर औद्योगिक वसाहत यांनी अतिक्रमण केले ही बाब नगर वाशी यांच्या लक्षात येताच नागरिकांनी पूर्णपणे विरोध दर्शविला व त्यांनी त्यांच्या बळावर पोलीस प्रशासन व मनपाचे काही अधिकारी यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आले होते त्यानंतर सातुर्णा येथील नगर वासियांनी नवीन नक्शा व या ठिकाणी झालेल्या कामाची प्रत दाखवण्यास सांगितले तर ते उडवाउडवीचे उत्तर देत होते  तसेच माजी नगरसेवक व उपमहापौर रामभाऊ सोळंके यांच्या लक्षात एक घटना लक्षात आणून दिली व धीरज वंजारी तसेच रामभाऊ सोळंके यांनी त्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली असताना त्यांच्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता तरी आज  संपूर्ण नागरिक यांना घेऊन महानगरपालिका चे आयुक्त साहेब अमरावती यांना भेटण्याकरिता  संपूर्ण सातुर्णा नगर वाशी यांनी महानगरपालिके वर धडक मोर्चा घेऊन गेले होते .

परंतु आयुक्त साहेब हजर नसल्यामुळे उपायुक्त साहेब यांना निवेदन देऊन परत यावे लागले पुढील कारवाई  लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्‍वासन उपायुक्त साहेब यांनी दिले  रामभाऊ सोळंके यांच्या नेतृत्वात संबंधित मोर्चामध्ये धीरज  वंजारी अरुण मदनगर मनोज कुकडकर राम ठाकुर विक्रम राठोड गजानन दुर्गे विकास मारोडकर उमेश काळे मंगेश नेरकर राजेश बेलपत्रे सीमा राठोड नेरकर ताई ढोके ताई तसेच भरपूर प्रमाणात महिलावर्ग व नगरवासी  नागरिक उपस्थित होते