Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ६जणांना ५दिवसांची पोलिस कोठडी

Responsive Ad Here


पहूर ता जामनेर

    पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लोणी गावी ग्रामपंचायतीच्या जागेवरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या  समोर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी  आलेल्या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकास आडवे आल्याने समोर आलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना  त्यांनी पोलिसांवरच  हल्ला   केला .याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात ७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती.तर  एक जण फरार झाला होता.    . 

     याप्रकरणीअटकेत असलेले  दत्तू कडू उगले , भास्कर काशिनाथ वाघ , ज्ञानेश्वर कडू उगले यांच्यासह महादू कडू उगले,किर्तीराज केशव उगले ,सागर उगले ,या सहा आरोपींना आज जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.    तसेच या गुन्ह्यातील पवन महादू उगले हा संशयित फरार झाला आहे .त्याचा पोलीस शोध घेत आहे.