भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
अन्न व प्रसाधन मंत्री कथा पालकमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेबांनी शिवाजी महाराज छत्रपती कसे झाले हे पत्रकारांना लिहिण्यास सांगितले उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पत्रकार संघाच्या माध्यमातूनच गड किल्ले स्पर्धा आयोजित केली होती .वेळ कमी पण रस्त्यावर सैन्य जास्त होतं , तेव्हा छत्रपतींना आणि छत्रपतींच्या दुर्ग किल्ल्यांना जनतेपर्यंत जसे आहेत तसे वर्णन करण्यात यावे असे सांगितले .तसाच एक प्रेरक प्रसंग
कोंड्याला कला,बाहेरं बघितलं रखरखतं,रणरणतंवाळवंट म्हणजे,गोवळकोंडा तरं अजून कोसो दूरं मग!
पालखी का थांबावी? महाराजांनी शिलेदाराला विचारलं
पालखी थांबवायचं प्रयोजन!... तसा शिलेदारं धावत आला..."महाराज!
गोवळकोंड्याचे बादशहा,कुतुबशहा स्वतः जातीनं आलेत".महाराजांना आश्चर्य वाटलं."गोवळकोंडा तरं
अजून कोसो दूरं" ... मग,बादशहा इथं!"
महाराज पालखीतनं खाली उतरले,सामोरं
पाहिलं,गोवळकोंड्याचे बादशहा,कुतुबशहा...!!! महाराज नजदीक गेले गळाभेट घेतली.
महाराजांनी विचारलं.."बादशहाजी आपणं इथं???",
तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला... "महाराज!
महाराष्ट्राचा 'जाणता राजा'आमच्या मातीत येतोय,त्याची पाऊलं आमच्या मातीला लागण्या आगोदरं
त्याच्या पाऊलांची पायधूळं आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथं पावेतो आलो महाराज!"...अरे!कोण गौरवं माझ्या राजाचा!
एवढचं नाही या गोवळकोंड्याच्या बादशहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत त्यांना स्वतःच्या राजधानीत घेऊन आला.
आगत,स्वागत, सत्कारं सोहळा झाला आणि गोवळकोंड्याचा बादशहा महाराजांना आपलं ऐश्वर्य, सामर्थ्य, संपत्ती दाखवत निघाला...
"महाराज!... हा आमचा खजाना हिरे,मोती,माणकं,सोनं,नाणं राशी राशी नुसत्या"...बघत राहिले
महाराज,,,अरे! कोण ऐश्वर्य!कोण संपत्ती!
"महाराज!...हि आमची अस्त्रंशाळा,इथं
नानावि अस्त्रं तयारं केली जातात"...
महाराज चकित झाले. "महाराज!...
हि आमची शस्त्रंशाळा,इथं वेगवेगळी शस्त्रं बनवली जातात"...महाराज बघत राहिले.
"महाराज!... हि आमची अश्वंशाळा, इथं जातीवंत
घोड्यांची पैदास केली जाते"...महाराज पहातच राहिले.
आणि "महाराज!... हि आमची हत्तीशाळा,हजारोंच्या रांगेनं उभे असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत ठरतं नव्हते"... अरे!
कोण सामर्थ्य,कोण सामर्थ्य...
महाराज पुरते भारावले आणि महाराजांची ती भारावलेली नजरं बघून गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला,"
महाराज!...आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे
हत्ती असतीलंच कि?!" महाराजांना काय सांगावं काही कळेना.
आमच्या सह्याद्रीच्या निबिड दऱ्या खोऱ्यात
हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही,सबब!आमच्याकडं हत्ती नाहीयेत...पण! सांगावं कसं ?
तसे महाराज म्हणाले..."बादशाहजी!...
आमच्याकडं तुमच्यासारखे असे हत्ती नाहीत,मात्रं हत्तीसारखी "माणसं" जरूरं आहेत.
मात्रं गोवळकोंड्याचा बादशहा त्याच्याही पुढचा तो म्हणाला,
"महाराज!... आपल्याकडं आमच्यासारखे हत्ती नाहीत,मात्रं हत्तीसारखी माणसं आहेत.मग!
महाराज त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलायं का?"...महाराजांच्या शेजारी
"येसाजी कंक"उभा होता,
महाराजांनी येसाजीच्या पाठिवरं थाप
टाकली आणि महाराज म्हंटले,"हा त्यातलाच आहे".
तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला,
"महाराज!... हा येसाजी हत्तीसारखा,हत्तीच्या ताकदीचा मग!
महाराज तुमचा येसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेलं का?",
तसा येसाजी सर्रदिशी पुढं झाला,"आज्ञा द्यावी महाराज!"
महाराजांची इशारत झाली,येसाजी रणंमैदानात उतरला,एकमात्रं अत्याधुंद...बलाढ्य आणि बुलंद हत्ती सामन्याला.
नजरं विकरंनेत्रं झाली, त्याचा कर्ण कर्कश्य चित्कारं घुमला आणि माणसांच्या कानठळ्या बसल्या...
"अरे! एsss...एsss...ए..ए वेड्या येसाजी नको करू धाडसं येsssयेsssये फिरं माघारी,मरशील फुका".
पण! येसाजी पुढं झाला होता,हत्तीच्या सामने खडा ठाकला होता.
हत्तीच्या शिखारापुढे तो घुमला...
सोंड फिरली सोंडेत येसाजी अडकला गर्र..sss...गर्र...sss...गर्र...sss...गर्र...sss...गर्र माणसांनी मिटले डोळे,
"संपला येसाजी...!" पण! त्याच वेळी विद्युलत चमकावी तसा येसाजी फिरला होता,आकाशातून उडाला होता,समशेरं तळपली होती. चालली होती सप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प एक भयानक
चित्कारं घुमला होता आणि सोंड छाटली हत्ती ढासळला होता,
येसाजीच्या समशेरीतून रक्तं रक्तं नितळंत होतं.
महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीचा पराभव
केला होता. येसाजी जिंकला होता.
त्याचं ते आरस्पानी शौर्य बघितलं
आणि गोवळकोंड्याचा बादशहा भारावला.अरे!
कोण शौर्य,कोण बहादुरी...
त्यानं स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला,येसाजीच्या सामोरं धरला...
"हे घ्या... हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस".तसा येसाजी सर्र्र्र्र्र्र्रदिशी मागं सरला आणि बादशहाला म्हणाला...!
"आमचं कौतुकं करायला आमचे "महाराज" समर्थ आहेत".
दुसऱ्याच्या कौतुकाची थापसुद्धा मावळ्यांनी कधी आपल्या पाठीवर पडू नाही दिली.
"निष्ठा"नाव याचं.हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते तिथं
'अस्मिता' जिवंत असते.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते तिथं 'स्वाभिमान' जिवंत असतो.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते तिथं 'राष्ट्रं'जिवंत असतं.
अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठत
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो.
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडाशिकवला जातो.
अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात. पण आमचं दुर्दैव.......
आम्ही शिवरायांचा इतिहास विसरायला लागलो याच मातीत जन्मले त्यांच्या पोवाड्याच्या ऐवजी आमच्यावर पाश्चिमात्त्य शैलीचे व फिल्मी गाने गुणगुणाया लागलो आपला विकास होतोय की पतन याचा विचार करा जय हिंद