Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी खास स्पर्धा व जनजागृती उपक्रम

Responsive Ad Here

भीमराव  चाटे   प्रतिनिधी 

 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे  विद्यार्थी मित्रांना वसुंधरेवरील सर्व प्राणी तथा वन्यजीव ही निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देणगी होय. या सर्व प्राण्यांचे व वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धन करणे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे.यासाठी शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी 1 ऑक्टोबर ते 07 आक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो.

  वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने मानवाला वन्य जीवांची माहिती व्हावी,त्यांचे महत्त्व समजावे व त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी तो सकारात्मक व्हावा यासाठी विविध उपक्रमांची आखणी केल जाते.तसेच वन्यजीव जनजागृती केली जाते. 

  

    वन विभाग सिंदखेड राजा, देऊळगाव राजा यांचे योगदान व उपक्रमाचा भाग म्हणून तथा राष्ट्रीय हरित सेना देऊळगाव राजा हायस्कूलचा सक्रिय सहभाग व उपक्रमाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून शाळेचे देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा चे प्राचार्य श्री.आर.बी.कोल्हे उपप्राचार्य प्रा.श्री.पी.डी.भौरकर  पर्यवेक्षकश्री.डी.व्ही.जाधव   पर्यवेक्षक श्री.डी.आर.पाटील

  समन्वयकप्रा.श्री.एन.एन.कोल्हे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.एस.एस.दुबे वनरक्षक मित्र व सैनिक मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वर्ग 05 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी

चित्रकला स्पर्धेचा विषय निवडून आपापल्या ज्ञानानुसार जनजागृती चे चार्ट निबंध सादर करून वन्यजीव संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने उचित संदेश देणारे कोणतेही चित्र. आपणास योग्य वाटेल त्या आकाराच्या कागदावर काढावे.  चांगले चित्र व चांगले विचार विद्यार्थ्या साहित प्रकाशित केले जाईल

 टीप:- चित्र काढलेल्या कागदावर चित्राखाली आपले नाव,शाळेचे नाव व संपर्क क्रमांक टाकून हे चित्र कार्यक्रम प्रभारी शिक्षक श्री. ज.ना.मेहेत्रे यांच्याकडे दिनांक 8 ऑक्टोबर 2021 ला दुपारी 02 वाजेपर्यंत जमा करावे वक्तृत्व स्पर्धा. वन्यजीवांचे महत्त्व,भूतदया वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन, मानव आणि प्राणी यांच्या मधील सहसंबंध या विषयावरील तीन ते पाच मिनिटांचे भाषण.

 

     टीप:- भाषणाची चांगली तयारी करून,आपला मोबाईल आडवा धरून,योग्य ते बॅकग्राऊंड घेऊन व्हिडिओ शूटिंग करून ती शूटिंग 8275233377 वनश्री मेहेत्रे सर या व्हाट्सअप क्रमांकावर दिनांक 8 ऑक्टोबर दुपारी 05 वाजेपर्यंत पाठवा बक्षीस.चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा... (एकूण 6 बक्षिसे)

 बक्षीस पात्र विद्यार्थी तथा प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

   टीप:- खुल्या गटातून पालक तथा संबंधितांना या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी सूचित करावेवन्यजीव सप्ताह कार्यक्रम प्रभारी तथा राष्ट्रीय हरित सेना प्रमुखदेऊळगावराजा हायस्कूल देऊळगाव राजा जय हिंद