Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कायदा जनजागृती शिबिर

Responsive Ad Here

 जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील गोंदेगाव  येथे विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने तालुका वकील संघ आणि एस एस मणियार लॉ कॉलेज येथील विद्यार्थी यांच्यामार्फत कायदा जनजागृती शिबिर ॲड. ज्ञानेश्वर बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले त्या दरम्यान तेजस्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड.एस आर पाटील यांनी कायदा अंतर्गत तर ॲड अर्चना किरोते यांनी महिला विषयी असलेल्या कायद्याची माहिती दिली, तसेच डॉ. सौ. भक्ती कुलकर्णी यांनी ॲसिड अटॅक मधील पीडित महिला व त्यांचे अधिकार या विषयी माहिती, तर डॉ. विजयानंद कुलकर्णी यांनी स्री पुरुष समानता या विषयी मार्गदर्शन केले, तसेच ॲड. ज्ञानेश्वर बोरसे आणि ॲड आशुतोष चंदेले यांनी विधी सेवा प्राधिकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करीत कार्यक्रमाचा समारोप केला प्रसंगी गावातील सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, व पोलिस पाटील, आशा स्वयसेविका, अंगणवाडी शिक्षिका, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी, तसेच ॲड. दिपाली सुरवाडे, ॲड देवेंद्र जाधव, ॲड प्रसन्न फासे, या कार्यक्रमाला उपस्थित होते.

  तसेच दोंडवडे येथे एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्पना शिंदे, प्रिया शिंपी, तेजस्विनी पाटील, पूजा सांखला, संकेत राजपूत,सचिन पाटील गोविंदा जाधव यांनी रॅली काढत कायद्याची जनजागृती केली दरम्यान गावातील सरपंच आणि ग्रामसेवक समवेत ग्रामस्थ मंडळी यांनी रॅलीत सहभाग नोंदविला त्या दरम्यान ॲड कोमल काळे यांनी विधी सेवा प्राधिकरण विषयी तर ॲड आशुतोष चंदेले यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा याविषयी मार्गदर्शन केले.