नांदुरा प्रतिनिधी
दिनांक 22/10/ 2021 रोजी नांदुरा शहरात सुमारे "280 लक्ष" रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूज केले..यामध्ये सर्वप्रथम मोहता प्लॉट अंतर्गत काँक्रीट नाली बांधकाम करणे,मोहता प्लॉट अंतर्गत रस्ता व नाली बांधकाम करणे,प्रभाग क्र 4 अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे,सातव नगर येथील नाली बांधकाम व पेव्हर बसविणे,नांदुरा खुर्द येथील प्रभू श्रीराम मंदिरासमोरील रस्ता काँक्रीटीकरण करणे,दरबार गल्ली अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे,प्रभाग 7 मधील अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम करणे,प्रभाग 8 मधील अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम करणे,प्रभाग 2 मधील शिवाजीनगर येथील अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम करणे तसेच प्रभाग क्र.1 मधील विविध रस्ते व नाली बांधकामाचा समावेश आहे.यावेळी नांदुरा शहरातील प्रत्येक वार्डाचा सर्वांगीण विकास करणे हाच माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असे मनोगत व्यक्त केले...!!
यावेळी नांदुरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्री.लालाभाऊ इंगळे, आणि सर्वश्री गोटूभाऊ गायकवाड,अजयभाऊ भिडे, विनोदभाऊ कोलते ,अजयभाऊ घनोकार, संदीपभाऊ फाटे, निलेशभाऊ कोलते ,संजुभाऊ टाकळक र ,आसिफसेठ,ऍड मोहतेशम रजा, मो.साजिदभाई, हाजी मुख्तारसेठ ,अनंतभाऊ भारंबे ,किशोरभाऊ खैरे ,गोकुलभाऊ खेडकर,यांच्यासह प्रत्येक प्रभागातील बहुसंख्य नागरिक तसेच असंख्य कार्यकर्ते,नेते,पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.....!!