Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लासूरचे शेतकरी सुलतानी संकटात

Responsive Ad Here

चोपडाप्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे शेतीपंपांची कनेक्शने तोडली जोडा -भारतीय कम्युनिस्ट पक्ष चा आंदोलनाचा इशारा

.. राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयाने लासुर येथील गरीब शेतकऱ्यांची  विजेचे बिल भरले नाहीत  विज कनेक्शन तोडून त्यांची खरीप वजा रब्बी हंगामाची पिके धोक्यात आणली आहेत पावसा विसरायचे की चोपडा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री टेकाडे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कालपासून कनेक्शन कट कर याचे आदेश दिले आहेत असे सांगितले परंतु लासुर येथील वीजतंत्री याने चार दिवसापासून शेतकऱ्यांची कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे

यावर्षी अति पावसामुळे त्यांच्या खरिपाचा हंगाम गेला त्यामुळे त्यांना वीज कनेक्शन भरता आले नाही तरीपण काही शेतकऱ्यांनी आगस्ट महिन्यामध्ये त्यांच्या यापैकी काही रक्कम भरलेले आहेत.असे असताना त्यांचे त्वीज कनेक्शन तोडणे हे अन्यायकारक आहे तरी आपणास विनंती की ताबडतोबीने त्यांची वीज कनेक्शन जोडून त्यांच्या शेतातील उभे पीक कांदा कपाशी मक्का व येणारे रब्बी पीक यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केलेली आहे  .


शेतकऱ्यांची नावे अशी

 १) सुभाष मार्तंड माळी यांचे  गट नंबर 38 चे  कनेक्शन तोडले  दीड महिन्यापूर्वी १०हजार रुपये बिल भरून सुद्धा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने कनेक्शन तोडले चार दिवसापासून कनेक्शन तोडलेने कांद्या चे उभे पीक जळत आहे २) शांताराम धनगर महाजन यांच्या गटनंबर 637 वरील ही  कनेक्शन कट केले आहे ३) रतिलाल सुकलाल माळी गट नंबर 640 यांचेही कनेक्शन तोडले त्यांच्यावर किती थकबाकी वगैरे काही माहिती देण्यात आली नाही ४)युवराज निंबा महाजन (  जगन्नाथ भिला पाटील यांचे नावे कनेक्शन) ५) उषाबाई शांताराम माळी ६)सुनीता मनोहर महाजन सिन्नरकर यांचे यांचे वीज कनेक्शन कट केल्या मुळे त्यांचे खरिपाचा हंगाम गेल्यानंतर सध्याचे पीक व पुढील रब्बी हंगाम याचे नुकसान होत आहे.

   या नुकसानीस महाराष्ट्र राज्य वीज मंडळ जबाबदार राहील कारण हे शेतकरी खरीप हंगाम आता गेल्यामुळे कर्जबाजारी झालेले आहेत तेव्हा या बाबतीत आपल्या कार्यालयाने निर्णय घेऊन त्यांचे कनेक्शन त्वरित जोडावीत अन्यथा शेतकरी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा किसान सभेने दिला आहे भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते अमृत महाजन काँग्रेस शांताराम पाटील ग्रामपंचायत सदस्य सुरेश महाजन रमेश महाजन वना माळी यांनी महाराष्ट्र वीज मंडळातर्फे शेतकऱ्यांवर लाभलेल्या सुलतानी संकटाचा  घटनेचा निषेध केलेला असून आंदोलनाचा वरीलप्रमाणे इशारा दिलेला आहे