शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
शहराच्या विकासासाठी पदाधिकारी,अधिकारी कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काची जाणीव होणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच कर्तव्य पार पाडणे सुद्धा आवश्यक आहे असे प्रतिपादन शेंदुर्णी नगरपंचायतीचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता सुहेब काझी यांनी केले.
जामनेर तालुका विथी सेवा समिती व जामनेर तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शेंदुर्णी नगरपंचायतीचे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुहेब काझी यांनी नगरपंचायतीचे कर्मचारी यांचे हक्क, कर्तृत्व यासोबतच कामगार कायद्याची सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविकात अँड. दिलीप वानखेडे यांनी या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश विषद केला. याप्रसंगी जामनेर तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. किशोर राजपुत ,नगरपंचायतीचे स्विकृत नगरसेवक अँड. धर्मराज सुर्यवंशी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी यावेळी आपल्या मनोगतात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी अँड. राहुल बावसकर, अँड. किशोर बारी,अँड. श्रीकृष्ण देवतवाल अँड. देवेंद्र जाधव अँड. गोपीचंद जावळे ,अँड.साबीर शेख,अँड. आशुतोष शुक्ल भाजपचे शहराध्यक्ष डॉ. पंकज सुर्यवंशी,नगरपंचायतीचे लोकेश साळी,कार्यालयीन अधिक्षक कलीम शेख तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन अँड. देवेंद्र पारळकर तर आभार अँड. प्रसन्न फासे यांनी मानले.