प्रतिनिधी देवळगाव राजा भिमराव चाटे
देशातील आतंकवादी संपवायचे असतील तर त्यांच्या आर्थिक बाजू वर प्रतिबंध लावला आणि अलग अलग मार्गाने येणारे अमली पदार्थ चरस गांजा अफू व त्यांचे ठेकेदार पकडले व त्यांच्यावर सक्त कारवाई केली तर ते देश हिताचे ठरेल . त्यासाठी तो अवैध धंदा करणारा कोणत्या जाती धर्माचा आहे, किंवा कोणत्या राजनीती पार्टीचा आहे, किंवा कोणत्या राज्यात कोणत्या पार्टीची सत्ता आहे आणि त्यांचा तो खास नातेवाईक असेल ते पाहून चालणार नाही . शिस्तीने केलेली कारवाई म्हणजेच तुमची खरी देशभक्ती असेल, भलेही तुमच्या जवळ बंदूक नसो, तुम्ही निस्वार्थपणे केलेली कडक कारवाई देशाच्या सीमेवर तटस्थ सैनिकांच्या प्रती तुमची देशभक्ती दर्शवेल.
आज देशातील बऱ्याच ठिकाणी ड्रग्स प्रकरणी धाडी पडत आहेत आसाम, पंजाब, महाराष्ट्र , यूपी, एमपी जवळपास मागच्या ४ ~५ महिन्यात एकूण २०-२२ राज्यात एनसीबी च्या धाडी पडल्या आहेत. याचे मुख्य कारण लक्षात घेता यातून मिळणारा पैसा हा देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात आहे.
असे एकंदरीत लक्षात आले आहे. जगाचा पोशिंदा किसान त्याचे काम करतोय शोकांतिका आहे की त्याच्या कष्टाची किंमत आपण करू शकत नाही. किसना च्या परिवारातून जन्म घेतलेला आणि देशाच्या सीमेवर उभा असलेला जवान त्यांच्याही कष्टाची संघर्षाची जाणीव असावी , आयुष्याचा गाभा ,तारुण्य, देशाला कुर्बान करणारा जवान हेही त्यांचे कार्य करत आहेत.देशाचा जवान आणि किसान हे त्यांचे कार्य करतात त्यांच्यावर कोणाला प्रश्नचिन्ह नाही. परंतु पुढे मायबाप सरकार आणि अधिकारी यांच्यावर बरेच प्रश्नचिन्ह आहेत , का कुणाला पाठीशी घालायचं? गांजा अफू ब्राऊन शुगर आम्ली तस्करी ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातून जास्त प्रमाणत केली जाते चायनीज वस्तूंचा सुळसुळाट देशांमध्ये होतो याचा सर्व अवैध रीतीने कमावलेला पैसा देशाबाहेर जातो. आणि आरडीएक्स दारू गोळा नक्सली हाथियार माध्यमातून या पैश्याचा वापर पुन्हा आपल्याच विरोधात वापरला जातोय. आपल्याच सैनिकांची जीवितहानी होते. नकळत आपलीच लोकं केवळ नशेच्या वापरासाठी आपल्याच देशातील तरुण पिढीला आतून पोखरत आहेत जे उद्याचे सीमेवरील सैनिक असतील ,त्यांना अगोदरच मारायला बसले आहेत. आपल्याला दुर्घटनाग्रस्त बिमारी ग्रस्त बनवण्यासाठी अनेक अनेक हात खंडे फंडे वापरले जातील. हे देशातील नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.
आज देशातील प्रत्येक कोपरा चायनीज वस्तू ड्रग्स ट्रक ट्रक भरून गांजा अफीम मग कुणाकडे 300 किलो असेल तर कोणाकडे 30 ग्राम असेल साखळी तर एकच? दहशतवादी उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. नोटाबंदी नंतर दहशतवादीं संघटनेने त्यांचा मोर्चा या विभागाकडे वळविला आहे. पहिले नोटांचे छापखाने त्यांच्याकडे होते ,नोटबंदी केल्या पासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. धारा 370 हटवल्या पासून त्यांना दहशत निर्माण झाली आहे. म्हणजे मी पॉलिटिकल बोलतोय असे नाही मी एक सैनिक संघटनेचा सेवक सर्व सैनिक मित्रांच्या वतीने आवाहन करतोय ड्रग माफिया यांना पाठीशी घालू नका आणि त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेठीस धरू नका मग गुन्हेगार आरोपी सरकारी अधिकारी, नेता ,मंत्री जवाई किंवा मुलगा असेल तरी न्यायदानात भेद होऊ देऊ नका.
कष्टाने आणि इमानदारीने खाणाऱ्या दोन बाजू जवान आणि किसान यांच्या कष्टाचा थोडासा विचार करा समर्थ समर्थन म्हणून 80 5556 8866 वर कॉल करा आणि दोन नंबरच्या कlळ्या पैशावर ऐशो आराम मौजमजा करणाऱ्या हरामी अवलादी नी काय कष्ट केले याचाही विचार करा. जागरूक राहा आणि आपल्यातील देशभक्ती दाखवा.