मो. असलम परवेज लोणार तालुका प्रतिनिधी
कोरोणाचा महिलांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता महिलांसाठी लोणार तालुक्यातील बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात 25 ऑक्टोबर 2021 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन सकाळी 9 ते दुपारी 4 वाजे दरम्यान ग्रामीण रुग्णालय लोणार येथील वैद्यकीय निरीक्षक डॉक्टर फिरोज शाह, आरोग्य अधिकारी डॉक्टर देवीशाला बालरोटवाड व डॉक्टर अमित ताजने यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
भिकाजी इंगळे यांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचा सत्कार करून आरोग्य शिबिराला सुरुवात केली. ग्रामीण भागात कामाच्या व्यापामुळे महीलांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराची गरज होती. करिता महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबिर आयोजनाद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन भिकाजी इंगळे यांनी केले.बीबी गावासह परिसरातील विविध गावांमधील महिलांनी या शिबिराला हजेरी लावली. या मध्ये महिलांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधी वितरण करण्यात आले.
भिकाजी इंगळे यांनी सर्व महिला रुग्णांना केळी आणि फळाचे वाटप केले. या शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोणा लसीकरण सुद्धा करण्यात आले. डॉक्टर फिरोज शहा यांनी कोरोणा लसीकरण करण्याबाबत महिलांमध्ये जनजागृती केले व सर्वांनी लवकरात लवकर या मोफत लसीकरनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नागरिकांशी केले. या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन परिसरातील बहुसंख्य महिलांनी आपले कोविड लसीकरण करून घेतले.
या शिबिरात डॉक्टर तडस, डॉक्टर नितीन सानप, डॉक्टर सोनल, डॉक्टर निखील अग्रवाल, डॉक्टर कविता मापारी लोणार व त्यांची टीम, डॉक्टर जाधव, डॉक्टर विवेक बंगाळे, डॉक्टर शेख, डॉक्टर विशाल रंगोले, डॉक्टर देवसेल बनसेढवाड, गजानन पाटोळे, आशिष पवार, एस पी ठोके, आर एन मुंडे, पंचायत समिती सभापती वर्षाताई इंगळे, उपसरपंच भास्कर खुळे, संतोष बनकर, अंबादास खंड, सुनील इंगळे, बबन बनकर, समाधान बनकर, तेजराव बनकर, अशोक वानखेडे, विठ्ठल चव्हाण, शिवप्रसाद बनकर, मुकेश बगडिया, गावान महाजन, निलेश चव्हाण, रवी बोडके आदी उपस्थित होते. शिबिराला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन यशस्वी केले.