तालुका प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे देऊळगाव राजा
-दिनांक 26 शहरापासून दहा किलोमीटर असलेला असोला फाट्यानजीक विना नंबरच्या टिप्पर चे व ट्रक चा समोरासमोर भीषण अपघात होऊन टिपर चालक जागीच ठार झाला. तर ट्रक चालक गंभीर जखमी असल्याचे त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले.
याबाबत प्राप्त माहिती अशी की असोला जहागीर फाट्याजवळ दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकरा च्या दरम्यान अरुंद रस्त्यामुळे ट्रक व टिप्पर ची समोरासमोर धडक झाल्याने यामध्ये टिप्पर चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये टिप्पर चालक प्रमोद जगन गाडेकर राहणार देऊळझरी तालुका जाफराबाद वय 40 हा जागीच ठार झाला .आहे तर ट्रक क्रमांक एम एच 34एव्ही 24 16 चालक संतोष खुशाल अगोली रा. चंद्रपूर यास गंभीर अवस्थेमध्ये औरंगाबाद येथे हलविण्यात आले याबाबत घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांनी घटनास्थळाला भेट दिली तर पोलीस निरीक्षक जयवंत सावंत व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळावर जाऊन वाहतूक सुरळीत केली सदरचा अपघात इतका भीषण होता की टिप्पर चालक हा टिप्पर च्या केबिन मध्ये अडकलेल्या अवस्थेत असताना जेसीबीच्या साह्याने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
यावेळी स्थानिक व तसेच पत्रकार या मंडळींनी सदर मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली त्यानंतर समोर तीन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली पोलीस व नागरिका यश आले. देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेहावर स्वच्छ करण्यात आली यावेळी सदर चा मृतदेह ताब्यात घेण्यास याबाबत नातेवाईकांनी नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.