Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्व, श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद अंतर्गत मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया अभियानाला सुरुवात

Responsive Ad Here

जळगाव जामोद:

             प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्युज चॅनल यांच्या संयुक्त कार्यालयाच्या उटघाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर दिनांक 2/10/2021 रोजी पार पडले होते. त्यामध्ये 178 रुग्णाची तपासणी करून त्यामध्ये 78 रुग्ण हे मोतीबिंदू ग्रस्त आढळले,त्यापैकी पहिल्या टप्प्यात 30 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले या मोतीबिंदू ग्रस्त रुग्णाची दखल घेत स्व,श्रीराम कुटे गुरुजी ट्रस्ट जळगाव जामोद विधानसभा मतदार संघा अंतर्गत मतदार संघातील मोतीबिंदू ग्रस्त लोकांसाठी प्रजा हीच राजा मी सेवेकरी ही भावना मनात ठेवून जळगाव जामोद मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ संजयजी कुटे यांच्या नेतृत्वाखाली अभियानाला सुरुवात करण्यात आली,

सदर रुग्णाची नेत्र तपासणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि सत्य पोलीस टाइम्स आयोजित शिबारामध्ये जळगाव जामोद येथील सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉ नंदकिशोर तायडे यांच्या मार्फत करण्यात आली असून मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही स्व श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद विधानसभा मतदार संघ आणि संजयजी कुटे आमदार जळगाव जामोद मतदार संघ हे करणार असून मतदार संघातील जनतेशी बोलत असतांना आज मी ज्या पदावर आहे ते माझया आई आणि स्व वडील व मतदार संघातील सर्व मायबाप यांच्या आशीर्वादाने आहे असे सांगत डॉ संजय कुटे यांनी आज दिनांक 26/10/2021 पासून स्व,श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून नेत्र तपासणी करून मोतीबिंदू ग्रस्त असलेल्या रुग्णची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा अविरत संकल्प केला असून मतदार संघात जे मोतीबिंदू ग्रस्त आहेत त्यांची शस्त्रक्रिया करून त्यांना चांगली दृष्टी मिळावी व चांगल्या प्रकारे बघता यावं आणि आमच्या सारख्या मुलांना आशिर्वाद देता यावा व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचे पुढील जीवन आनंदात जावे हेच आमचे समाधान.तसेच मतदार संघातील वयोवृद्ध व्यक्ती त्यांची कुठल्याही प्रकारची अडचण हि स्व,श्रीरामजी कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न अविरत चालू ठेवू असे त्यांनी मतदार संघातील लोकांसोबत बोलतांना म्हटले. 


   मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी येणाऱ्या रुग्णांचा नेण्या आणण्याचा खर्च व जेवणाची व्यवस्था स्व,श्रीरामजी कुटे चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात येईल. यावेळी जळगाव जामोद येथील सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉ नंदकिशोर तायडे,बाळूभाऊ कुटे,पंकज कड, राहुल ताठे(प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ कार्याध्यक्ष तथा सत्य पोलीस टाइम्स उपसंपादक),विठ्ठल गावंडे(तालुका अध्यक्ष तथा जळगाव जामोद तालुका विशेष प्रतिनिधी) योगेश म्हसाळ (तालुका प्रतिनिधी),आकाश उमाळे(बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी),गौरव चोपडे(संग्रामपूर तालुका प्रतिनिधी),अतुल दंडे(हिंदवी प्रतिष्ठान अध्यक्ष) भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मतदार संघातील नागरिक उपस्थित होते