गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल - ग्रामसभेत श्रीमंत लोकांची नावे लाभार्थी यादीतून कमी करून त्या ऐवजी गरजू व गोरगरीब अश्या लाभार्थयांची निवड करावी असे आवाहन आ.चिमणराव पाटील यांनी येथे केले. एरंडोल तहसील कार्यालयात ४ ऑक्टोबर २०२१ रोजी तालुका स्तरीय व नगरपालिका स्तरीय दक्षता समितीची संयुक्त सभा घेण्यात आली त्यावेळी ते अध्यक्षपदा वरुन ते बोलत होते. या वेळी दक्षता समितीचे २२ नवीन सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व सर्व सदस्यांना ओळखपत्रे वितरीत करण्यात आली.
![]() |
| एरंडोल तहसील कार्यालयात झालेल्या दक्षता समितीच्या सभेप्रसंगी आ. चिमणराव पाटील हे परेश बिर्ला यांना दक्षता समितीच्या निवडीचे ओळखपत्र देतांना सोबत तहसीलदार सुचिता चव्हाण व हरेश पांडे दिसत आहे |
गरीब व गरजू लोकांना शासकीय योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी दक्षता समितीच्या सदस्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे असे प्रतिपादन आ. चिमणराव पाटील यांनी केले.
प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक संदीप इंगळे यांनी केले. सुत्र संचालन पुरवठा अव्वल कारकून ज्ञानेश्वर राजपूत व नंदकिशोर वाघ यांनी केले. तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. या वेळी परेश बिर्ला, नगरसेविका आरती महाजन, मनिषा चौधरी, चंदू जोहरी,अतुल ठाकूर, रेवानंद ठाकूर, हरेश पांडे, ज्ञानेश्वर बडगुजर, प्रवीण पाटील, कल्याणी पाटील, सुरेखा महाजन,रवि चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
