Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चिखली तहसील कार्यालयात शासन निर्णयाची होळी

Responsive Ad Here

प्रतिनिधी चिखली

राज्य शासनाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या जि. आर. ची होळी 


चिखली - दि. 20 ऑक्टोबर रोजी रयत क्रांती संघटना,रासपच्या वतीने चिखली तहसील समोर महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी व महापुरातल्या शेतकऱ्यांसाठी काढलेल्या मदतीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

राज्यामधे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, मा.मुख्यमंत्री व शासनातील मंत्र्यांनी या विषयी सरकार आपत्तीग्रस्तांना भरीव मदत देणार आहे असे वारंवार सांगितलेले होते पण दिनांक ६-१०-२०२१ च्या जी आर नुसार शासनाने आपत्तीग्रस्तांची क्रूर चेष्टा करत अत्यल्प मदत जाहीर केलेली आहे, फडणवीस सरकारने २०१९ साली आपत्तीग्रस्तांसाठी काढलेल्या जी. आर. प्रमाणे मदत द्यायला पाहिजे होती ,त्यांनी जिरायत पिकासाठी हेक्टरी ६००००  व बागायती पिकांसाठी हेक्टरी १००००० रूपये तातडीने मदत द्यायला हवी, तसेच शेतकऱ्यांचे चालू पीक कर्ज माफ करण्यात यावे, करिता संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जि आर चा निषेध म्हणून शासन निर्णयाची होळी करण्यात आली ,तसेच दिनांक ८ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमीट लावण्यासंबंधी जी. आर.काढून राज्य सरकारला अधिकार दिलेला आहे,राज्य सरकारने सोयाबीन व खाद्य तेलावर स्टॉक लिमिट लावू नये.

   यामुळे ऐन हंगामात सोयाबीनचे दर पडणार आहेत,राज्य शासनाला हा स्टॉक लिमीटचा  केंद्राचा जी. आर.लागू न करण्याचा अधिकार आहे,राज्य सरकारने तो अधिकार वापरून सोयाबीन उत्पादकांना दिलासा द्यावा,दोन्ही जी आर शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असून ते तात्काळ मागे घेण्यात यावे राज्य शासनाचा निषेध म्हणून  दोन्ही जी,आर ची होळी चिखली  तहसिल कार्यालयासमोर करण्यात आली व नायब तहसीलदार विर साहेब यांना निवेदन देण्यात आले.

   याप्रसंगी रयत क्रांती संगटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील,रासपचे मीडिया जिल्हा प्रमुख भरत जोगदंडे,ता अध्यक्ष गणेश देशमुख,जयदेवराव शेळके,येवले मामा, रयतचे ता अध्यक्ष सचिन काकडे,शहराध्यक्ष सचिन पडघान,युवा जिल्हा उपाध्यक्ष विशाल वायाळ,मनोज काटिकर,गणेश जाधव,कामगार आघाडी ता अध्यक्ष प्रकाश पंडागळे,ग्रा पं सदस्य दीपक धनवे,सुहास पाटील,ऋतिक पाटील,शिवम इंगळे, मंगेश सुरडकर, मधू निबोळे,तेजस खरे,मोहम्मद शहा,सखाराम सोरमारे, दिलीप मोळवंडे,संतोष देशमुख,अनिल देशमुख, संतोष रोडगे, सुनील देशमुख,विठ्ठल परिहार,मुरलीधर  सुधाम,विषवनभर मुरलीधर यांच्या सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.