Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल संजीवन व्यसनमुक्ती केंद्रात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती तसेच व्यसनमुक्ती जनजागरण सप्ताह चा शुभारंभ.

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

एरंडोल येथील संजीवन व्यसनमुक्ती केंद्रात 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी व व्यसन मुक्ती जनजागरण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी एरंडोल नगर पालिका उप नगराध्यक्ष सौ आरती ताई महाजन शिवसेनेचे युवा सेना प्रमुख अतुल दादा महाजन यांनी गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

    केंद्राचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी प्रास्ताविकातून व्यसनमुक्ती केंद्राच्या विविध उपक्रमाच्या माहिती दिली युवा सेना प्रमुख अतुल दादा महाजन यांनी आपल्या मनोगतातून केंद्राच्या कार्याचे कौतुक करून भावी उपक्रमास शुभेच्छा दिल्या तरुण व्यसनमुक्त राहिला तरच सशक्त भारत व गांधीजींच्या स्वप्नातला भारत तयार होण्यास मदत होणार आहे म्हणून तरुणांनी व्यसनापासून लांब राहण्याच्या आव्हान केले.

कार्यक्रमास केंद्राचे पदाधिकारी राजेंद्र ठाकरे, संजय बागड, गोकुळ पाटील, अजय महाजन, सह डॉक्टर उमाकांत मराठे, गोरख नाना चौधरी, भिला पाटील, पत्रकार पंकज महाजन, दिगंबर बोरसे, सह व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण उपस्थित होते.