मो.असलम परवेज: लोणार
बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांकरिता या अगोदरच दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक घोषित करण्यात आले होते परंतु त्यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. बुलढाणा यांच्या दिनांक 22 ऑक्टोबर 2021 च्या एका पत्रान्वये बदल करण्यात आलेले आहे.
यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दीपावलीची शालेय सुट्टी दिनांक 02 नोव्हेंबर 2021 पासुन दिनांक 13 नोव्हेंबर 2021 पर्यंत होती. पण या कालावधीमध्ये म्हणजे दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी नॅशनल अचीवमेंट सर्वे (NAS) अंतर्गत होणाऱ्या परीक्षेमुळे सुट्टीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेले आहे. या परिपत्रकानुसार दिवाळीची सुट्टी दिनांक 28 ऑक्टोबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 अशी घोषित करण्यात आली आहे.