रामेश्वर जायभाये प्रतिनिधी तळणी
तळणी : येथील खाजगी सोयाबीन खरेदीदार बालासाहेब खंदारे यांच्या सोयाबीन खरेदीचा शुभारंभ तळणीचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उध्दवराव पवार यांचे हस्ते व भाजपाचे गजानन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आला.
शुभारंभ प्रसंगी सोयाबीनला खरेदीचा ५ हजार रुपये क्यूटल असा दर शेतक-यांना मिळाला. यावेळी तात्याश्री ट्रेडर्सचे अमोल राऊत , कानडीचे शरद खंदारे , सकाळ बातमीदार प्रदिप तळणीकर, पुण्यनगरी पत्रकार नाना राजपूत , अंकुश राठोड व सुरेश शिंदे आदींची उपस्थिती होती.