Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथे शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल प्रतिनिधी

शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने व उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल  येथे दि.२३-१०-२०२१ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महारक्तदान शिबिर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत लसीकरण, ५० गरजू लोकांना जीवनाआवश्यक वस्तूचे    वाटप,आणि सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.



        कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहसंपर्क प्रमुख जळगांव गुलाबराव वाघ हे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने,

महीला आघडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख,एरंडोल जगदीश पाटील, सुनिल भोळे,डॉ.शंकरलाल सोनवणे,उमाकांत शिंपी, दिक्षा पाटील ,अनवर खान हे होते.सहसंपर्क प्रमुख जळगाव गुलाबराव वाघ यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


                कार्यक्रमाचे आयोजन एरंडोल येथील शिवसैनिक, युवासेना,पदाधिकारी, स्नेही, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांनी केले होते.यावेळी नगरसेविका कल्पना महाजन,हर्षाली महाजन, प्रमोद महाजन,संदीप पाटील ,रवि जाधव मा.सरपंच,किशोर निंबाळकर माजी नगराध्यक्ष ,संजय महाजन मा.उपनगरध्यक्ष,कैलास पाटील मा.सरपंच भालगाव ,विनोद पाटील ग्रा.प सदस्य भालगाव, निलेश मराठे ग्रा.प.सदस्य भालगाव,अरुण महाजन,अनिल महाजन, गजू महाजन,नितीन महाजन समाजसेवक, भिका चौधरी ,सागर महाजन,महेश महाजन समाजसेवक, नाना महाजन भालगाव,आकाश महाजन, हेमंत पाटील,भूषण महाजन, संजु महाजन,कल्पेश देशमुख,कमलेश महाजन, समाधान महाजन, भाऊ महाजन,कल्पेश दशरथ महाजन ,सचिन महाजन,सुनील माणुधने,प्रसाद दंडवते,स्वप्नील महाजन आणि समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.