भीमराव चाटे दे राजा
देऊळगाव राजा चिखली मार्गावर एमआयडीसी एरिया मध्ये पंचगंगा सीड्स चे ऑफिस व गोडाऊन आहे तेथून मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी किमान 700 एकर कांदा लागवड केली होती इतर पिके पिकली नाहीत शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचं नातं जपणारी पंचगंगा कांदा उत्पादक सीड्स ने दीपावलीच्या सणाच्या निमित्ताने शेतकरी अडचणीत असताना 15 कोटी 91 लाख रुपयाचे धनादेश शेतकऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवून देण्यात आले.
पंचगंगा सीड च्या वतीने विभागीय मॅनेजर भानुदास वाघ साहेब व ऍडव्होकेट जगदीश मीनासे साहेबांच्या हस्ते किनगाव राजा येथील शेतकरी गजानन भगवान चीपाटे यांना 35 हजार रुपये चा चेक बोनस स्वरूपात मिळाला. मागच्या वर्षी कांदा घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव केली होती, मात्र यावर्षी बोनस मुळे शेतकरी सुखावले आहेत व साहेब आम्हाला यावर्षी कांदा वाढवून द्या अशी प्रत्येक शेतकऱ्याची ओरड आहे. मागच्या वर्षी पेक्षा दीडपट कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे क्षेत्रफळ वाढण्याची शक्यता आहे.
जे शेतकरी ठिबकद्वारे खता औषधीची ड्रिचिंग करतात त्यांना उत्पादनामध्ये झडीत आलेले आहे तेवढेच त्यांना बोनस वाढवून मिळालेले आहे. अतिवृष्टी व गारपिटीने मुळे हंगामातील पिके हाती आली नाही ,जे जवळ होते ते फळ भाजीपाले कोरोनामुळे विकता आले नाही, आणि शेतकरी कोलमडला.
अशातच पंचगंगा सीड्स शेतकऱ्यांना आधार दिल्यामुळे शेतकरी सुखावले म्हणून आभार व्यक्त करत आहे ,व यावर्षी कांदा घेण्यासाठी करार पत्रक करून पैसे भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती .
जवळपास बुलढाणा जिल्हा भरातून शेतकरी कांदा बीज उत्पादन लागवडीसाठी नेतात असे विभागीय मॅनेजर भानुदास वाघ साहेब यांनी सांगितले. जय जवान जय किसान सैनिक मित्र फाउंडेशन मासैनिक मित्रांनी यांनी पंचगंगा सीड्स अधिकाऱ्यांचे आभार मानले जय हिंद