Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संत चोखोबा जन्मभूमी मेहुणा राजा येथे ऊस तोडणीला सुरुवात

Responsive Ad Here

 भीमराव चाटे दे राजा 

देऊळगाव राजा तालुक्यात संत चोखा सागर खडकपुर्णा धरण प्रकल्प असल्यामुळे पंचक्रोशी दहा किलोमीटर पर्यंत ऊस लावण्याचे प्रमाण या दोन वर्षांमध्ये वाढलेले आहे. जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरु होण्याची वाट पाहत पाहत शेतकरी मुक्ताईनगर कारखान्यास ऊस देत आहेत .साखर कारखान्याकडून मागील प्रमाणे बावीसशे रुपये भाव अपेक्षित होता परंतु अठराशे 1900 वर समाधान मानत शेतकऱ्यांनी ऊस तोडणी सुरू केलेली आहे. 

  पाऊस पडल्याची नुसकान भरपाई म्हणून सरकार कडून जे येईल तेच बोनस समजले जाईल. ऊस बागायतदार रामदास जी बोंद्रे गणेश बारगजे भगवानराव बोंद्रे शिवाजी सोसे गजानन  खाडे पवन बोंद्रे यांनी ऊस तोडणी मशीनचे नारळ फोडून, "गजानन गणपती मसोबा मारुती  काम लागू दे सुती पाती" म्हणून पूजन केले  .व ऊस कटिंग मशीन पायलटचे रुमाल टोपी घालून स्वागत केले .शंभर सव्वाशे एकर असलेल्या उसाचे क्षेत्र या वर्षी दीड पटीने वाढण्याची शक्यता आहे. 

   बऱ्याच व्यक्ती धरणाचे पाणी उशाशी असल्यामुळे व मजूर वर्ग नेट सीड्स च्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे मजुराची चणचण असते, म्हणून यंत्राद्वारे कामे होतात करिता ऊस लावण्यावर भर देत आहे ,ऊस नेण्याकरता रस्त्याची अडचण असते त्याकरिता मंजूर झालेल्या रस्त्यां ची कामे लवकरात लवकर कामे व्हावी अशी शेतकऱ्यांची ओरड आहे, व गावातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट उस नेले जाईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे जय जवान जय किसान सैनिक मित्र फाऊंडेशन ने सांगितले आहे, जय हिंद