Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पैनगंगा नदीच्या महाराष्ट्रभरातील भक्तजन उत्तरेश्वर मंदिरावर

Responsive Ad Here

 भीमराव गवई प्रतिनिधी देऊळगाव 

        श्री   कृष्णदास वारकरी शिक्षण संस्था सद्गुरु अण्णा महाराज इंगळे उत्तरादा पेठ चिखली पैनगंगा नदीच्या तीरावर उत्तरेश्वर  मंदिर मंदिरावर महाराष्ट्र वारकरी संघटनेचे अध्यक्ष हरी भक्त पारायण प्रकाश बुवा जवंजाळ पीठाधीश महांत स्वामी स्वरूपानंद सद्गुरु वैकुंठवासी भिमराव अण्णा महाराज इंगळे यांचे महाराष्ट्रभरातील भक्तजन अनुयायी कीर्तनकार प्रवचनकार दीपावली च्या पूर्वसंध्येला श्रीकृष्णाचा भाचा अभिमन्यू उत्तराचा विवाहच या ठिकाणी झाला होता त्या उत्तरेश्वर मंदिरावर जमा झाले.

     रात्रीचे भजन प्रवचन करून सकाळी काकडा नंतर सर्व भक्तांनी एकमेकाला उटणे लावून ज्याप्रमाणे सद्गुरु अण्णा महाराज प्रत्येक शिष्याला मुला पेक्षा जास्त सांभाळून त्यांना उठणे लावत असे त्यांच्या उटण्या तून निघालेल्या मुळीला स्वतःच्या अंगावर लावत असे ही परंपरा कायम भक्तांच्या या उपक्रमातून दिसली दिवाळीच्या पर्वावर कोणी घर सोडत नाही परंतु गुरु प्रेम म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेले भक्त यांची सेवा राजू भाऊ शास्त्री इंगळे परिवार व सर्व पंचक्रोशीतील भक्त यांनी एकमेकाची सेवा करून या कार्यक्रमाचा आनंद घेतला भजन कीर्तन चालू असताना एकमेकाचा उठाने लावून नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये अभ्यंगस्नान केले अवघा पंढरपुरातला आनंद येथे सर्व भक्तांनी घेतला.

    त्यानंतर महाप्रसादाची महा पंगत बसली व मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी भक्तांची मांदियाळी यांनी प्रकाश महाराज जवंजाळ यांच्यासोबत हितगूज केले प्रत्येक भक्ताने आपापल्या दोन दोन मिनिटाच्या प्रतिक्रिया दिल्या व पुढील नियोजित कार्यक्रमाच्या तारखा ठरवण्यात यावे व प्रत्येक भक्तांनी आवर्जून यावे असे सांगण्यात आले ज्या भक्तांना एकवेळ खाण्याची सोय  नव्हती  गावात मधुकरी मागून आणायची आणि सद्गुरु अण्णांच्या समक्ष संस्थेमध्ये एकत्रित करून खायची आज मधुकरी कुणी मागत नाहीत परंतु प्रत्येक भक्त आपापल्या घरी होऊन डबा घेऊन येतो आणि सर्व एकत्र करून त्या जेवणाचा आनंद घेतात ही गोष्ट कोरोना च्या पलीकडची आहे.

     येथील प्रत्येक भक्त आज सक्षम झालेले आहेत ज्यांना अन्नाची प्रसादी मिळाली ते सुखी आणि समृद्ध आहेत नदीच्या पात्रात असलेले हे मंदिर आजूबाजूला गावाची वस्ती होती महापुराचा त्यांना वेळ खराब असते त्यामुळे गावात सोडून नवीन वस्ती तयार झालेली आहे नवीन ठिकाणी मंदिर सुद्धा ही झालेले आहेत परंतु या जागेचा महिमा फार मोठा आहे आणि भक्त जन येथे आवर्जून हजेरी लावतात आणि कार्यक्रमाचा आनंद घेतात 1008 श्री श्री श्री स्वामी स्वरूपानंद जी महाराज तेथे आल्यापासून आवर्जून प्रत्येक भक्तांना बोलावून घेतात आणि सपत्नीक मुलाबाळांसह भक्त येथे येतात प्रत्येक भक्ताला वैकुंठवासी सद्गुरु अन्नाच समजून त्यांच्यावर प्रेम करतात जय हरी