भीमराव चाटे प्रतिनिधी जळगाव
मा पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच सिंधू आई व लक्ष्मणराव पऱ्हाड यांचे चिरंजीव गजानन पऱ्हाड भारतीय सैन्यात सात मराठा मध्ये 18 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले .त्यांचा सत्कार सोहळा कोरोना महामारी मुळे होऊ शकला नाही. आणि त्यातच ते पुन्हा महाराष्ट्र पोलीस म्हणून रुजू झाले व बीड पोलीस स्टेशनला कार्यरत आहे सैनिकाची भाची वैष्णवी शिवाजीराव सपकाळ सुनिता शिवाजीराव सपकाळ जिल्हा परिषद सदस्य जालना यांच्या कन्येचा जन्मदिवसाचे औचित्य साधून देऊळगावराजा तालुक्यातील भारतीय माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांसह डिग्रस बुद्रुक येथील हेमाडपंती महादेव मंदिराच्या सभामंडपामध्ये सत्कार सोहळा व नगर भोजन झाले. कारगिल विजेता गजानन पऱ्हाड यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात मध्ये दुर्गम भागांमध्ये सेवा दिली
त्यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये भगवानराव चाटे भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हा उपाध्यक्ष, भीमराव उबाळे तालुका अध्यक्ष ,विश्वनाथ नागरे सचिव, रतन रेषवाल सहसचिव, शिवराम मांटे कोषाध्यक्ष, भीमराव चाटे सैनिक संघटक ,श्रीधर मांटे रामेश्वर जायभाये, दत्तात्रय जाधव, चोर, श्रीकृष्ण बंगाळे, रामदास पवार, काशिनाथ काकड ,रामराव सरोदे शिवराम कंकाळ, दिनकर बनसोडे शेख गजनफर ,गजानन सानप, शिवनारायण सांगळे, शिरसाट साहेब सर्व माजी सैनिक मुकेश शिंदे सेवारत सैनिक शिरसाट साहेब रुस्तुमराव टेकाळे गुरुजी ,हरिभक्त पारायण सखाराम महाराज श्री अरविंद दिनकर पाटील माजी सभापती देऊळगाव राजा ,नरेश पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, ओम आत्माराम पऱ्हाड उपाध्यक्ष मातृतिर्थ पत्रकार संघ, यांचे रुमाल टोपी शाल-श्रीफळ देऊन स्वागत झाले व संघटनेचे वतीने जेष्ठ माजी सैनिक विश्वराज नागरे साहेब यांनी सेवानिवृत्त सैनिक यांचा सत्कार केला सोबतच सैनिक पत्नी मीनलताई ला साडीचोळी देऊन सत्कार केला
सैनिकाचे वडील लक्ष्मणराव पऱ्हाड यांनी जावई शिवाजीराव सपकाळ व मुलगी सुनीता जालना जिल्हा परिषद सदस्य यांना जोड आहेर देऊन सत्कार केला. व नगर भोजन महाप्रसाद अन्नदानाचे नियोजन केले. पंचक्रोशीतून दे राजा तालुक्यातील सर्व सैनिक मित्र आले, तुळशीचे लग्न आजी माजी सैनिक सत्कार सोहळा, पुनर नियुक्त पोलीस गुणगौरव सोहळा, व सैनिकाची भाची वैष्णवी सपकाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा निमित्त सर्व गोष्टींचा योगायोग घडवून मोठ्या प्रमाणात हा सोहळा पार पडला, भारत माता की जय ,जय जवान जय किसान, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम चालला. सर्व आजी माजी सैनिक मित्रांचे सैनिक पिता लक्ष्मणराव पऱ्हाड यांनी आभार मानले, व सत्कार सोहळा संपन्न झाला . मधेच संत चोखा सागर येथे माजी सैनिकांनी भेट दिली. सैनिक डायरी क्रमशः जय हिंद