Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गावाच्या नावाचे फलक नसल्याने वाहनधारकांमध्ये आक्रोश.

Responsive Ad Here

एरंडोल प्रतिनिधी गणेश महाजन

एरंडोल येथील राज्य महामार्ग 27 एरंडोल भडगाव नांदगाव येवला राज्य महामार्ग चे नुतनीकरण करण्यात आले. त्यावेळेस सूचना फलक  काढण्यात आले होते रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावरही ते परत लागलेले नाही त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे.



एरंडोल येथील कासोदा,उत्राण रस्त्यालगत  फलक नसल्याने, वाहनधारक सार्वजनिक  बांधकाम विभागाकडे(पारोळा रस्त्याच्या दिशेने) जातात, तिथून विचारून परत मार्गस्थ होतात. येथून रोज दुसर्या राज्यातील मोठी वाहने उत्राण येथील निलोन्सँ कंपनीत जात असतात, त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय टाळावी आणि आतातरी मार्ग फ़लक लावण्यात यावे अशी वाहनधारकांची मागणी आहे.

तसेच नवीन तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर पाणीपुरवठा शुद्धीकरण जवळ मोरी खचलेली असल्याने  दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे यासाठी ही सार्वजनिक बांधकाम विभागाने  त्वरित दखल घ्यावी असे वाहनधारकांची अपेक्षा आहे.