प्रतिनिधी गणेश एकंडवार
आजच्या धकाधकीच्या युगात माणसं माणुसकीला पारखी होत चालली आहेत.! कुणालाही कुणासाठी माया, ममता, प्रेम, जिव्हाळा उरला नाही..!! जो तो आपलंच भलं करण्याच्या मागे लागला आहे. पणं समाजात अजूनही काही देवदूत आहेत त्यांच्यामुळेच जग सुरळीत सुरू आहे..!! असच जवळा येथील अल्पभूधारक शेतकरी दत्ताभाऊ तडसे..!!
दत्ताभाऊ च्या बँक खात्यात हिंगोली येथील हळद व्यापाऱ्याचे १,९९,८७५ रुपये चुकीने जमा झाले. दत्ताभाऊ बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बँक अधिकाऱ्यांना पत्र लिहून ती रक्कम ज्याची असेल त्याला परत द्यावी ही विनंती केली आणि समोरच्या व्यक्तीला फोन लावून तुमचे पैसे सुरक्षित आहे याची हमी दिली.. व त्या व्यक्तीचे पैसे त्यांना परत केले.. सत्य आणि न्यायाच्या बाजूने राहुल प्रामाणिकपणाची माणुसकीची मशाल उभी करून जवळावासियांची मान उंचावली.. प्रामाणिकपणा हीच खरी ओळख देणाऱ्या दत्ताभाऊंचा छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समिती आणि गावकरी च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी देवधर साहेब तलाठी जवळा, माधवभाऊ राठोड, आशिष ढाकुलकर, उमेश चावरे, गणेश धनोडे, रुपेश आडे, मनोज जाधव, साबिर डागवाला, हरिभाऊ कोटमकार, आमजत पठाण, राजू काटपेल्लीवार, योगेश तडसे आदी उपस्थित होते.