अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
पोलीस निरीक्षक दिपक वानखेडे यांनी माहिती देताना वर्तवली शक्यता.
अंजनगाव सुर्जी शहरात गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली या आरोपींकडून आणखीनही शस्त्रसाठा व आरोपी सापडू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक वानखडे यांनी दिली.सविस्तर माहिती नुसार अंजनगाव सुर्जी शहरातील अजीजपुरा येथे पोलीसांना काही युवक शस्त्र तयार करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अजीजपुरा येथील एका घरावर धाड टाकली असता दोन तलवारी,दोन फडशा,एक जाम्बिया,दोन धारदार लोखंडी पाईप,एक फाइटर चेन फडशा व यांना धार लावण्यासाठी इलेक्ट्रिक मशीन सापडली आहे.यामध्ये दोन आरोपी जुबेर खा वल्द अनवर खा वय २६ वर्ष व मोहम्मद तल्हा मोहम्मद रफिक वय २३ वर्ष दोन्हीं राहणार अजीजपुरा अंजनगाव सुर्जी येथील असुन या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र शस्त्र अधिनियम कायद्या अंतर्गत कलम ४/२५ व जिल्हाधिकारी यांचे कलम ३७ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सह कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.यामध्ये आणखी शस्त्रसाठा व आरोपी सापडण्याची शक्यता असल्याने पोलीस याचा कसून तपास करीत आहेत.
सदर कार्यवाही विषयी पोलीस निरीक्षक यांना विचारणा केली असता आरोपींची कसून तपासणी करून त्यांच्याकडून आणखी माहिती मिळण्यासाठी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत.तपास चालु असून आणखी शस्त्रसाठा व आरोपी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक दिपक वानखडे यांनी दिली.